पेंच प्रकल्पाचे पाणी सूरनदीत व नहरात सोडण्याची मागणी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सुरनदीमध्ये पाणी नसल्याने मोहाडी तालुक्यात विविध गावांमध्ये पिण्याचे पाण्याची समस्या निर्माण झाली आहेत. यातील अनेक गावातील नळ योजना ह्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. नगरपंचायतचे ठिकाण असलेल्या मोहाडी तर दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. शिवाय भोसा, टाकळी खमारी, पिंपळगाव(झं) चोरखमारी, रामपूर, मांडेश्वर, खुटसावरी, खोडगाव, नेरी, पाचगाव येथील पिण्याचे पाण्याची नळ योजना प्रभावित होऊन बंद होण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळ्याची चाहूल लागतात तालुक्यातील सूरनदी व नाल्यातील पाणी सुकलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. शिवाय वन्य प्राणी पिण्याच्यापाण्यासाठी गावात प्रवेश करीत असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
करीता पेंच प्रकल्पाचे पाणी सुर नदीमध्ये व परिसरातील नहरात लवकरात लवकर सोडण्यात यावे अशी मागणी पाचगाव जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य आनंद मलेवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र ही त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेले आहे. मोहाडी तालुक्यात पाण्याची पूर्तता करणाºया सुरनदी व वैनगंगा ह्या दोन प्रमुखनद्या आहेत. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच नद्याचे पाणी सुटलेले आहे. यातील सुरनदीवरील तर विविध गावाच्या नळ योजना बंद पडल्या आहेत. मोहाडी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मोहाडीतही पाण्याची भीषण टंचाई निर्माण आहे. याशिवाय तालुक्यातील विविध गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. आता तर वन्यजीव पाण्याच्या शोधात गावापर्यत येऊन पोहचत आहेत.
मोहाडी तालुक्यात सध्या वाघाची दहशत सुरू आहे. यामुळे गावात राहणाºया व शेतात काम करणाºया नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेत पाचगाव जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य आनंद मल्लेवार यांनी जिल्हा जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे. त्यात पेंच प्रकल्पाचे पाणी सुरनदीमध्ये व तालुक्यातील सर्व नहरात लवकरात लवकर सोडण्यात यावे. जेणेकरून नागरीकासहित प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने सदर मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी जि.प. सदस्य आनंद मलेवार यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *