साकोली शहराला मॉडेल बनविणार – आ. नाना पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : मागील ५ वर्षात भाजपने नगरपरिषदेत साकोली सेंदूरवाफा शहराचा काय खेळ खंडोबा केला यावर जनता आक्रोशित आहे. आगामी काळात याला जनताच प्रतिउत्तर देईल. मी या क्षेत्राचा आमदार असल्याने आणि साकोली तालुका माझी कर्म व जन्मभूमी असल्याने या शहराचे सौंदर्यीकरण करून मॉडेल शहर तयार करणे आणि विकासात भर घालणे हे माझे प्रथम कर्तव्य समजतो असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी साकोली येथील पंचशील वार्डात ५ कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन समारोहात व्यक्त केले. आपल्या उदघाटनीय भाषणात आ. नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपला खºया अर्थाने विकास साधता आला नाही. कारण भरमसाठ निधी येऊनही त्यांना विकास कामाचे योग्य नियोजन करता आले नाही. त्यांची सरकार असल्याने त्यांना भ्रष्टाचार दफन करणे सहज शक्य झाले असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला.

साकोली येथे विशेष रस्ता अनुदान योजना अंतर्गत आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृह ते एम. बी.पटेल कॉलेज पर्यंत सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे भुमिपुजन यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महिला पदाधिकारी प्रतिभा शिंदे, जि.प.सभापती मदन रामटेके, नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर, जि.प.सदस्या शितल राऊत, पं. स. सभापती गणेश आदे, शहराध्यक्ष दिलीप मासूरकर, महिला कॉंग्रेस शहराध्यक्ष पुष्पा कापगते, जि.प.सदस्य नारायण वरठे, डॉ.अजय तुमसरे, उपविभागीय अभियंता मटाले, सरीता करंजेकर, पं.स.सदस्य वालोदे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या प्रास्ताविकात अश्विन नशिने म्हणाले की, साकोली नगरपरिषदेने ६ वर्ष घालविली पण या मुख्य रस्त्याकडे कधीच लक्ष दिले नाही. साकोलीत आज आ. नाना पटोले यांच्या प्रयत्नाने ५ मजली उपजिल्हा रुग्णालय, नविन पोलीस ठाणे इमारत आणि इतर विकासकामांचा धडाका सुरु केला आहे आणि ते सर्वांना दिसत आहे. तसेच यापुढे साकोली सेंदूरवाफा शहराच्या सौंदर्यात कुठेही कमी पडणार नाही. या उदघाटन सोहळ्याचे संचालन उमेश कठाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साकोली तालुका कॉंग्रेस, शहर काँग्रेस, महिला कॉंग्रेस, युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली व लाखनी तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजनही केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *