तेलाचे डब्बे चोरणाºया दोघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : किराणा दुकानाच्या गोदामातील तेलाच्या पिंप्याची चोरी करणाºया दोघांना सिहोरा पोलीसांनी अटक करीत ४८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त. विक्की उर्फ लालन शेंडे वय २५ वर्षे, व सुजीत भुमेष राऊत वय २० वर्षे दोन्ही रा. खळबंदा ता. जि. गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत. सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया मुरली येथील सुनील धनराज शरणागत वय ३४ वर्षे यांचे किराणा दुकान असुन त्यांच्या गोडावुनचे कुलुप तोडुन अज्ञात आरोपींनी ४८ हजार ५०० रुपये किंमतीचे तेलाचे पींपे चोरून नेल्याची तक्रार सिहोरा पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आली होती. सिहोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी सदर प्रकरणाचा तपासाची चक्रे फिरवीत सायबर पोलीसांच्या मदतीने चोरी करणाºया विक्की उर्फ लालन शेंडे व सुजीत भुमेष राऊत यांना ताब्यात घेवुन त्याची अधिक चौकशी केली असता त्यांनी पिपे चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलीसांनी चोरी केलेला माल शिव सोयाबीन तेल कंपनीचे टीनाचे पिपे प्रत्येकी १५ किलोचे ०८ नग किं. १६,८०० , फॉर्चुन सोयाबीन तेले कंपनीचे टिनाचे पिपे प्रत्येकी १५ लिटरचे ०८ नग किं. १६,८००/-रु. , फॉर्चुन सोयाबीन तेल कंपनीचे कॅन प्रत्येकी १५ किलो चे ०५ नग कि. ११,०००/-रु. व फॉर्चुन सोयाबीन तेल कंपनीचे कॅन प्रत्येकी ०५ लिटरचे ०५ नग कि. ३९०० रु. असा एकुण ४८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात आणखी एका आरोपीचा समावेश असुन सिहोरा पोलीस त्याचा शोध घेत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.