वाटमारी व खुनातील चार आरोपींना मुंबईतून अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सालेकसा तालुक्यातील पानगाव तलावाजवळ ९ आॅक्टोबर २०२१ रोजी चार अज्ञात आरोपींनी दुचाकीवरील दोघांना मारहाण करुन त्यातील एकाचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने नवी मुंबई येथून तीन आरोपी व एका अल्पवयीन मुलाला अटक केली. नरेश आनंद दास (२०) रा.पानगाव, कुलदीप सुमरदास फुलारे (१९) रा.ओटेकसा, वरुन उर्फ महिंद्र जगतराम बुरकुडे (१९) रा.नवाटोला अशी आरोपींची नावे आहेत. सालेकसा खूर्द येथील विश्वनाथ बाळकृष्ण मोटघरे व गोपाल बावणकर रा.निंबा हे आमगाव येथून घटनेच्या दिवशी रात्री दुचाकीने सालेकसाकडे जात असताना पानगाव तलाव शिवारात चार अज्ञात आरोपींनी त्यांना अडविले व मारहाण करुन त्यांच्याजवळील दुचाकी, मोबाईल व रोख रक्कमबळजबरीने हिसकावली तसेच गोपाल बावणकर याचा खून करुन पळ काढला. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. दरम्यान हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे समांतर तपासासाठी देण्यात आले. स्थागुशा पथकाच्या तपासा दरम्यान नरेश दास, कुलदीप फुलारे, वरुन उर्फ महिंद्र जगतराम बुरकुडे व अल्पवयीन मुलाने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिस नागपूर येथे शोध घेत असताना आरोपी हे नवी मुंबईत आपली ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने नवी मुंबईच्या सानपाडा परिसरातील अक्षरा बांधकामावरुन तीनही आरोपी व अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना सालेकसा पोलिसात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय भिसे, संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनात स्थागुशाचे पोनि बबन आव्हाड, सपोनि विजय शिंदे, सफौ कापगते, पो.हवा.ठाकरे, कोडापे, देशमुख, पोना पटले, पोशि केदार, मानकर, भांडारकर, चालक पोहवा बंजार, पांडे तसेच सालेकसाचे सपोनि हेगडकर, पोउपनि शिंदे, पोशि रोकडे आणि सायबर सेलचे सपोनि सिद व त्यांच्या पथकाने केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *