अपघात ; बोलेरोच्या धडकेत मोटार सायकलस्वाराचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सरांडी धादरी उमरी तिरोडा मार्गावर झालेले बोलेरो मोटरसायकलचे अमोरासमोर धडकेत मोटार सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याने तिरोडा पोलिसांनी बोलेरो चालका विरोधात गुन्हा नोंद करून बोलेरो व चालकास ताब्यात घेतले आहे. दिनांक २६ रोजी दुपारी १२.३० वाजता चे दरम्यान केसलवाडा येथील ५० वर्षिय विनोद कमलाकर कुकडे आपले मोटार सायकल क्रमांक एम. एच. ३५ ए. डी. ८९३५ ने तिरोडाकडे येत असताना तिरोडा येथून धानाची बिजाई घेऊन हरदोली कडे जात असलेले बोलेरो क्रमांक एम. एच. ३६ ए. ए. २०५७ क्रमांकाचे बोलेरो व मोटार सायकलची दादरी जवळील पटले पोल्ट्रीफार्म जवळ अमोरासमोर धडक होऊन मोटार सायकल स्वार विनोद कुकडे ५० यांचे उजवे पाय हात व डोक्याला गंभीर जखमा झाल्याने त्यांना उपचारा करता भंडारा येथे नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाल्या. तिरोडा पोलीस स्टेशन येथे बोलेरो चालक मोरेश्वर झंझाड ३५ वर्ष राहणार हरदोली याचे विरोधात भादवी कलम ३०४ (अ) २७९ नुसार गुन्हा नोंद करून बोलेरो व बोलेरो चालकास तिरोडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढिल तपास नापोशी प्रशांत कावळे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.