बारव्हा येथील तस्कर महसूल विभागाच्या जाळ्यात मात्र कारवाई शुन्य

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील बारव्हा येथील मरिमाय घाटातून रोजच बेसूमार रेतीचा अवैध उपसा होत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रशिध्द होत असून यासबंधाने महसूल प्रशासन जागृत नाही असे म्हणता येणार नाही वेळोवेळी महसूल विभागातील अधिकाºयांनी बारव्हा परिसरात येरझाºया मारून रेती भरलेले ट्रॅक्टर पकडून कारवाई होत असल्याचा देखावा देखील होत आहे मात्र अद्याप एकही रेती भरलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लागले नाही यामुळे त्या पकडलेल्या ट्रॅक्टरचे नेमकं काय झालं हा प्रश्न सध्या बारव्हा वाशियांना अनुत्तरित आहे. मागील आठवड्यात झालेल्यातस्करीचे जाळे कदाचित महसूल अधिकारी यांचेशी तर नसावे ना असा तर्क सध्या परिसरातील नागरिक लावत आहेत अनेकदा होत असलेल्या तक्रारी आणि महसूल विभागाचे आर्थिक संबंध सध्या संबंध प्रशासनाला काळीमा फासताना दिसते गावात अधिकारी आले की त्यांचेवर ग्रामस्थांच्या नजरा लागून असतात साहेब काय करणार ही उत्सुकता गावकºयांच्या मनात असते मात्र सर्व उलटच घडताना दिसते अधिकारी का-रवाईच्या नावाखाली वसूली करून मोकळे होतात मात्र या संघटनांच्या युगात मोबाईल क्रांतीमुळे सर्वसामान्यही सुजाण झाले असून आलेल्या अधिकाºयांवर पाळत ठेवून मोबाईल वर त्यांच्या कारणाम्याची चित्रफित उतरवून ती जनमानसाला दाखवून होत असलेली किंवा तस्करासोबतचे हितसंबंध पानटपरिवर आपसांत एकमेकांना दाखवून चाललेल्या तस्करीचे जिम्मेदार आज महसूल प्रशासनाला धरीत असून मरिमाय परिसरातील साठवणूक केलेले रेतीसाठा जप्ती करतील का ? या कडे वरिष्ठ लक्ष देऊन कारवाई करतील का ? गावातील रेती साठा जप्त करतील का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *