राष्टÑीय महामार्गावर वाघाचे दर्शन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : मागील सहा महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या मोहघाटा जवळील भुयारी मार्गाचे काम कुठवर आले ? हे पाहण्यासाठी अखेर खुद्द वाघालाच वारंवार यावे लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून राष्ट्रीय महामार्गावरील मोहघाटा जंगल शिवारात वाघाचे वास्तव्य असल्याने वनविभागाची झोप उडाली आहे. मोहघाटा जंगल शिवारात सध्या महामार्गाच्या उडानपूलाचे काम सुरू असून मागील तीन चार दिवसापासून या परिसरात कोणत्याही क्षणी आणि कुठूनही जंगलातील कुठल्याही भागातून वाघ सरळ महामार्गावरच येत असल्यामुळे या ठिकाणी काम करणारे मजूर व कंपनीचे कर्मचारी तसेच या परिसरातून ये जा करणारे प्रवासी व वाहन चालक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.

मोह घाटा जंगल परिसरात वारंवार होणारे अपघात टाळता यावे व वन्य जीवांची या परिसरातून सुरळीत ये जा व्हावी याकरिता बºयाच वर्षापासून प्रलंबित असलेला उडान पुलाचे काम सध्या संथ गतीने सुरू असून हे परिसर जंगल व्याप्त असल्यामुळे या परिस रात जंगली प्राण्यांच्या नेहमीच वावर असतो काही महिन्यापूर्वी याच परिसरात एक मादा बिबट अपघातात जखमी झाली होती त्यानंतर काही दिवसांनी त्याच मादा बिबट्याच्या अपघातात मृत्यू झाला त्यामुळे या परिसरात अपघातामध्ये निष्पाप वन्य प्राण्यांच्या नाहक बडी जातो त्यामुळे या ठिकाणी वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर उडान पूल निर्मिती होते आहे सध्या या परिसरात गुरुवारपासून एका पट्टेदार वाघाने दिवसाढवळ्या दर्शन दिल्यामुळे महामार्गावरील मजूर व कर्मचाºयांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे या वाघाने परत सोमवारी सुद्धा दुपारी रस्त्यावर भ्रमण केलेत्यानंतर आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान परत महामार्गावरील वन विकास महामंडळाच्या कंपार्टमेंट मधून मोह घाटा जंगल शिवारातून येत सराटी जंगल शिवारात प्रवेश केला आतापर्यंत या वाघाने कुणावरही हमला केला नसला तरी या परिसरातून जाणारे प्रवासी वाहन चालक काम करणारे मजूर कर्मचारी यांच्यामध्ये कमालीची दहशत आहे तरी या वाघावर नजर ठेवण्याकरिता वन विभागाने विशेष मोहीम राबविण्याचे आवाहन वन्य प्रेमींनी केले आहे.

‘वाहनचालकांनी रस्त्यांवर वाघांच्या किंवा वन्य प्राण्यांच्या संभाव्यतेची जाणीव ठेवणे आणि या भागात सावधपणे वाहन चालवणे देखील महत्त्वाचे आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी, जेव्हा वाघ किंवा वन्य प्राणी सर्वात जास्त सक्रिय असतात तेव्हा वाहन हळू चालविणे आणि अतिरिक्त सतर्क रहावे’

जितेंद्र वंजारी, क्षेत्र सहाय्यक, चीचगाव क्षेत्र वन विकास महामंडळ

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *