बेटेखारी नदीच्या प्रवाहात ४३ वर्षे व्यक्ती गेला वाहून

तालुका प्रतिनिधी मोहाडी:भंडारा जिल्ह्यात मागील दोनतीन दिवसापासून येत असलेला पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत.यातच मोहाडी तालुका अंतर्गत येणाºया आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया बेटेखारी नदी पात्रात जाम या गावातील बबन सपाटे वय ४३ वर्ष हा वाहून गेला आहे. हा व्यक्ती गायी चारण्यासाठी गेला असून परत येत असताना नदीचा पाण्यात अचानक वाढ झाल्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाहात तो वाहून गेला असल्याची घटना घडली आहे. मात्र २४ तास उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने नातेवाईकांनीच स्वत: ठीवर लोकं कडून मदत घेऊन शोध कार्य सुरू केले आहे. मात्र मागील दोन दिवसापासून शोध कार्य सुरू असून सुद्धा सदर व्यक्ती मिळाला नसून सदर व्यक्तीची चप्पल घटनास्थळावरून मिळालेली आहे.मात्र प्रशासन अद्यापही कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.