जुन्या वादातून गोळ्या झाडुन इसमाची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी तुमसर-गोबरवाही मार्गावरील रेल्वे फाटक समोर थांबलेल्या वाहनातील ईसमावर बंदुकीतुन गोळ्या झाडून ठार केल्याची घटना आज दि.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली. नईम शेख व ५० वर्षे असे मृतकाचे नाव आहे. नईम शेख हा त्याचे अन्य तीन मित्रांसह त्यांच्या चारचाकी गाडीने कटंगी बालाघाट इथुन तुमसरकडे परतीच्या प्रवासाला असताना गोबरवाही येथे मेमु ट्रेन जात असल्याने रेल्वे फाटक पडले असल्याने नईम शेख याच्या गाडीचाजकाने रेल्वे फाटकाजवळ गाडी थांबवली असता व ते गाडीतच बसून होते.

दरम्यान मागेहुन टवेरा गाडीतून काही इसम उतरूले व नईमच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नईम शेख याच्यावर बंदुकीतुन गोळ्या झाडल्या. त्यात नईम हा जागीच ठार झाला. तर त्याचे साथीदारांनी घटना स्थळावरून पळ काढला. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी केली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या प्रकरणात सात आरोपी असल्याची माहिती असुन त्यापैकी तीन आरोपींना पोलीसांनी अटक केल्याची माहिती आहे मात्र मुख्य आरोपीसह तिघे फरार असल्याची माहिती आहे. माहितीची मिळताच भंडाºयाचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी घटनास्थळी दाखल होत सविस्तर प्रकरणाची माहिती जाणुन घेतली. गोबरवाहीचे पोलिस निरीक्षक नितीन मदनकर व तुमसर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे व उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मीता राव घटनास्थळी दाखल झाले.पुढील तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.