रोहयो मजूरांना दिले वित्तीय साक्षरतेचे धडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : बचत व गुंतवणूक म्हणजे काय, ती कशी करायची? बचत आणि महागाई यांच्यातील परस्पर संबंध, विम्याचे विविध प्रकार कोणते, आरोग्य विम्याचे फायदे, जीवन विमा का काढला पाहिजे, कामगारांसाठी कोणत्या विविध योजना आहेत. याबद्धलची माहित देण्यासाठी भारतीय रिझर्व बँक, बँक आॅफ महाराष्ट्र द्वारा संचालित क्रिशील फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार हमी योजनेच्या मजूरांना वित्तीयसाक्षरतेचे धडे देण्यात आले असून, सदर कार्यक्रम तालुक्यातील आथली या गावात १४ जून रोजी घेण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रिशील फाऊंडेशनचे एल.डीओ. राजकुमार जयस्वाल व ए.एम. निनावे उपस्थित होते.

त्यांनी आर.बि.आय बद्दल माहिती देऊन, डिजिटल बँकिंग सेवा, डिजिटल व्यवहार, क्लेम सादर करणे, पि.एन. सुरक्षाबिमा योजना, पि.एन. जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या योजना, या विषयी माहिती देऊन, रोजगारांसोबत चर्चा करुन त्यांच्या मनातील शंका, कुशंका सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी सरपंच एरिया मॅनेजर प्रीतम निनावे, सेंटर मॅनेजर कृपाली इलमकार, योगेश उके, तसेच आय.सी.आर.पी. लोचना भावे उपस्थित होते. ग्रामपंचायत रोजगार सेवक यांच्या सहकायार्ने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.