घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळु द्या – प्रहार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी तहसील कार्यालयातर्फे जप्त करण्यात आलेली शेकडो ब्रास रेती तहसील कार्यालय परिसरात पडुन असुन सदर रेती तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्यात यावी अशी मागणी प्रहार तर्फे पवनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. पवनी शहरासह संपुर्ण तालुक्यात मागील अनेक महिन्यांपासून घरकुलाचे काम रेती अभावी अडकून पडलेआहेत महसूल विभागाने जप्त केलेला शेकडो अवैध रेतीसाठा पवनी तहसील कार्यालयात जप्त असून ती वाळु घरकुल बांधकामाला न देता शासकीय लिलावामार्फत मोठ्या ठेकेदारांच्या घशात टाकण्यात येत आहे. तरी तालुक्यातील घरकुल योजनेला लागणारी रेतीची मागणी लक्षात घेता पवनी तालुक्यातील घरकुल योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी रेती अभावी अडलेल्या घरकुलांना तात्काळ मोफत वाळु देवुन घरकुलांचे काम पूर्ण करण्यास मदत करावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.मागणी पुर्ण न झाल्यास प्रहार तर्फे तिव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *