जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेचे भंडारा येथे लोकार्पण

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : श्रीक्षेत्र नाणीज (रत्नागिरी) येथील जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या आणखी एका रुग्णवाहिकेचे आज नागपूरभंडारा महामार्गावरील वृंदावन लॉन भंडारा येथे लोकार्पण करण्यात आले. महामार्गावरील या टापूत होणाºया अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याचे काम ही रुग्णवाहिका करणार आहे. ही सेवा पूर्ण मोफत आहे. रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकाला यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. आता येथे ही रुग्णवाहिका २४ तास अपघातग्रस्तांच्या सेवेत असणार आहे. याबाबतची माहिती अशी की, नाणीज क्षेत्री गुरुपौर्णिमेच्या दिवशी नवीन पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यातील आणखी एक रुग्णवाहिका भंडारा येथे देण्यात आली आहे. याभागात होणारे वाढते अपघात लक्षात घेऊन संस्थानने हा निर्णय घेतला आहे. संथानच्या या उपक्रमाचे डॉ. दिपचंद सोयम यांच्यासह उपस्थित अनेक मान्यवरांनी कौतुक केले. मोटार वाहन निरीक्षक सुहास ठोंबरे यांनी यावेळी ही सेवा अपघातग्रस्तांसाठी कशी व कियी उपयुक्त आहे ते विशद केले. ते म्हणाले,” येथे होणारे वाढते अपघात लक्षात घेता आशा रुग्णवाहिकेची गरज होती. ती पूर्ण झाली आहे. शिवाय ही सेवा पूर्ण मोफत आहे. हे संस्थानचे वेगळेपण आहे.”

सोहळ्यास खालील मान्यवर उपस्थित होते- भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक डाँ.दिपचंद सोयाम, भंडाºयाचे मोटार वाहन निरीक्षक सुहास ठोंबरे, पूर्व विदर्भ उपपीठ प्रमुख राजेद्रकुमार भोयर, पूर्व विदर्भ नागपूर उपपीठ व्यवस्थापक प्रविण परब, भंडारा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, जीवन शिक्षण संस्था लेखणीचे धनंजय तिरपुडे, लेखणीचे डाँ.चंद्रकांत निंबार्ते, पूर्व विदर्भ महिला निरीक्षक पुष्पा दळवे, उपपीठ कमिटी सदस्य मुन्नालालजी मोटघरे, पूर्व विदर्भ सचिव विशाल नवगीरे, हिंदी प्रवचनकार प्राचार्य माधव दियेवार, उपपीठ कमिटी सदस्य बाबुराव चौव्हान, गोंडीयाचे जिल्हा निरीक्षक नवरंग मेश्राम, जिल्हा निरीक्षक आसिफबाद दिलीप गायकवाड, जिल्हा निरीक्षक भंडारा सुरेश लाखे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भंडारा जिल्हा सचिव होमराज वणवे यांनी केले. संस्थांकडे आता एकूण ४२ रुग्णवाहिका आहेत. गेल्या १३ वर्षांपासून अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवणारी ही सेवा सुरू आहे. ती पूर्ण मोफत आहे. या सेवेमुळे आत्तापर्यंत १९ हजारांवर जखमींना जीवदान मिळाले आहे.आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष संतोष भुरे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *