कुशारीची शुभांगी गायधने मोहाडी तालुक्यातून प्रथम तर जिल्हात तिसरी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वतीने इयत्ता दहावीची नागपूर विभागीय प्रमाणपत्र परीक्षा मार्च-२०२३ मध्ये घेण्यात आली. यामध्ये स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय मोहाडी येथून २१५ विद्यार्थी परिक्षेला बसले. प्राविण्यप्राप्त श्रेणीत ५७, प्रथम श्रेणीत ८५, द्वितीय श्रेणीत ५०, तृतीय श्रेणीत ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल ९३.४८ टक्के लागला. कुशारीची कु.शुभांगी अरुण गायधने हिने ५०० पैकी ४८३ गुण ९६.६० टक्के घेऊन मोहाडी तालुक्यातून प्रथम व जिल्ह्यातून तिसरी आली आहे. आंधळगावची कु.आराधना अरविंद कारेमोरे ४७३ गुण ९४.६० टक्के शाळेतून दुसरी आली आहे.

मोहाडीची कु.कृतिका प्रीतम डेकाटे ४७१ गुण ९४.२० टक्के प्राप्त करून तिसरी तर मोहाडीची कु.अंशू विनोद अंबुले ४६९ गुण ९३.८० शाळेतून चवथी आली आहे. महालगावची कु.सुप्रिया उमेश बुराडे ४६९ गुण ९३.८० टक्के पाचवी, कु.सुहानी राजकुमार नंदनवार ४६४ गुण ९२.८० टक्के सहावी, चोरखमारीची कु.तन्नू कन्हैयालाल बिरणवार ४६२ गुण ९२.४० टक्के सातवी,पारडीची कु.ज्ञानेश्वरी मनोहर झंझाड ४६१ झंजाडची कु.सायली लव झंझाडे ४३६ गुण ९१.२० टक्के नववी, पारडीचा तुषार प्रदीप मते ४४७ गुण ८९.४० टक्के दहावा, खुटसावरीचा साहिल कन्हैयालाल लिल्हारे ४४० गुण ८९.२० टक्के अकरावा आला आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-मुख्याध्यापक अविनाश चौधरी, वर्गशिक्षक उत्तरा बिसेन, रुपेश साखरवाडे, प्रकाश मते, प्रकाश सिंगनजुडे, किरण देशमुख, गोपाल दादगाये, शरद मालोदे, हितेश्वरी पटले, विनय शिवरकर, रेखा चकोले, भरत रासे, संजीव डोंगरे, हेमंत लोंदासे, विनोद ढगे यांना दिले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक नारायणराव तितीरमारे, अध्यक्ष शरद तितीरमारे, सचिव प्रमोद तितीरमारे, कविता तितीरमारे, नम्रता कुंभलकर, निर्मला नागपुरे, उमेश कडव, कुंदा तितीरमारे, रमेश खोब्रागडे, मदन गाढवे प्रवीण मोहतुरे, शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप सपाटे, विनोद बोरकर, प्रतिक्षा वाघाये, जिवन सार्वे, चुनीलाल आगाशे, रमेश ठवकर, नरेश उईके यांनी अभिनंदन केले आहे. निकाल जाहीर होताच शाळेचे मुख्याध्यापक अविनाश चौधरी व शिक्षकवृंदांनी विशेष प्राविण्य प्राप्त विद्याथीर्नीच्या घरी जाऊन गुण ९२.२० टक्के, पिंपळगाव पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.