रोहयोत उत्कृष्ट कामगिरीत मोहाडी पंचायत समिती

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून त्याची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचे शासन स्तरावर नुकतेच मुबंई येथे सत्कार करण्यात आले. यात मोहाडी पंचायत समितीने बाजी मारीत रोहयोच्या कामात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल निवड करण्यात आली. मुंबई येथे मनरेगा आणि विविध विभागाचे योजनांचे अभिसरण करून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे व ग्राम समृद्धी योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मोहाडी खंड विकास अधिकाºयांचा शासनाकडुन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपालासह मुख्यमंत्री व विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. मुंबई येथे यशवंतराव चव्हाण केंद्र नरिमन पॉईंट येथे मनरेगा आणि विविध विभागाचे योजनांचे अभिसरण करून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे व ग्राम समृद्धी योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम २०२०-२१ ते २०२२-२३ या वर्षात उत्कृष्ट काम करणाºया महाराष्ट्र राज्यातील जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचाºयांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी बजावणाºयात भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत गटविकास अधिकारी मोहाडी, लाखनी, तुमसर या तीन तालुक्याची निवड करण्यात आली. गरीब व बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने शासनाने प्रत्येक पंचायत समितीला मनुष्यदिनाचे उद्दिष्ट दिले असते असेदिलेले उद्दिष्ट वरील तिन्ही पंचायत समितीने उत्कृष्ट पद्धतीने गावागावात पोचून पूर्ण केले. यात मोहाडी पंचायत समितीने कोरोना तर काळातही उत्कृष्ट कामगिरी बजावली.
कोरोना काळात कार्यालयात कर्मचाºयांचे प्रमाणही फार कमी असताना देखील येथील खंडविकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांनी आपल्या कार्यशालीने रोहयोची कामांची उत्कृष्टपणे अंमलबजावणी केली. याच उत्कृष्ट कार्याची दखल शासनस्तरावरून घेण्यात आली. मोहाडी येथील खंड विकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांना सत्कार करण्यासाठी मुबंई येथे पाचारण करण्यात आले होते.मात्र अतिआवश्यक घरगुती कार्यक्रमात व्यस्त असल्याने खंडविकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांच्या ठिकाणी सहाय्यक खंडविकास अधिकारी भुजाडे यांनी मुंबई येथे जाऊन सत्कार स्वीकारला. यावेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नरेगाचे अतिरिक्त सचिव नंदकुमार, विभागीय आयुक्त गोयल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मोहाडी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी पल्लवी वाडेकर त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *