आज बोथली येथे परमात्मा एक सेवक संमेलन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत विविध गावात सेवक संमेलन व महान त्यागी बाबा जुमदेवजी व्यसनमुक्ती व ग्रामस्वच्छता अभियान आणि सामुहिक हवन कार्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेवक संमेलनाच्या एक दिवसापूर्वी प्रत्येक गावात महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. आज रविवार दि.१२ मार्चला बोथली, सोमवार दि.१३ मार्चला गांगला, मंगळवार दि.१४ मार्चला खैरी (बेटाळा), बुधवार दि.१५ मार्चला सकरला ईत्यादी गावात सेवक संमेलन होणार आहेत.
संपूर्ण गावातील कार्यक्रमाचे उद्घघाटन बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष यशवंतराव ढबाले यांच्या अध्यक्षतेखाली आध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रसारिका लता दिलीप बुरडे यांच्या हस्ते होणार असून प्रमूख अतिथी म्हणून मोहाडी मंडळाचे उपाध्यक्ष नरेश सवालाखे, सचिव मोरेश्वर सार्वे, सहसचिव राजू पीलारे, कोषाध्यक्ष कंठीराम पडारे, संचालक नत्थु कोहाड, एकनाथ जीभकाटे, गुरुदास शेंडे, राजू माटे, रविकुमार मरसकोल्हे, सरस्वता माटे, व्यवस्थापक भगवान पीलारे, लक्ष्मण माहुले उपस्थित राहणार आहेत. सामूहिक हवन कार्य, शोभायात्रा, सत्कार, मानव जाग्रुती व अंधश्रद्धा निर्मूलन यांवर परिसंवाद, महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या शिकवणीवर मार्गदर्शन होणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *