सिहोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर: सेंट जॉन मिशन मायनॉरिटी इंग्लिश मिडीयम हाईस्कूल सिहोरा येथे नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक निलेश गोस्वामी, प्रमुख अतिथी म्हणून सौ.रंजना तुरकर सरपंच सिहोरा, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीरा भट्ट, विदर्भ सेक्रेटरी आंतर राष्ट्रीय ह्युमन राईट्स फेडरेशन, सुनील कुमार कटरे, सौ रेणू गिडीयन प्रेसिडेंट सोसायटी, जॉन्सन गिडीयन सेक्रेटरी, अनूप गिडीयन डायरेक्टर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पाहुण्याचे स्वागत करुन मुलांनी सुंदर असे विविध गाण्यावर सांस्कृतिक कार्यक्रमघेण्यात आले. सोबतच आलेल्या पाहुण्यांचे मार्गदर्शन केले. गोसावी यांनी शिक्षण हा भावी आयुषाचा पाया आहे. त्यामुळे शिकाल तर पुढे जाल असे मोलाचे मार्गदर्शन केले.
मीरा भट्ट यांनी मुलांमध्ये लहानपणापासून भेदभाव करू नका समान शिक्षण, वागणूक द्या, पालकांनी सायंकाळचा वेळ मुलांसोबत घालवा, दिवसभराच्या अभ्यास व त्या व्यतीरीक्त थोडी चर्चा मुलांसोबत करावी असा मोलाचा सल्ला दिला. या कार्यक्रमाकरता शिक्षिका नलिनी हेडाऊ, करिश्मा मानवतकर, रोषणा पारधी, ममता बनकर, ज्योती कटरे या शिक्षक वृंद, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. करिश्मा मानवतकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.