चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला करणा-या दोषींना कठोर शिक्षा द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : चंद्रशेखर आझाद यांच्यावर भ्याड हल्ला करणा-या समाजकंटकांची सीबीआय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर गोबरवाही यांच्या मार्फत देशाचे गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उत्तरप्रदेशातील भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार झाला आहे.

चंद्रशेखर आझाद सामाजिक व आंबेडकर चळवळीतील क्रांतिकारक नेतृत्व आहे. त्यांच्यावर हल्ला करुन आंबेडकर चळवळीला दडपण्याचा कुटिल डाव आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी अश्या आशयाचे निवेदन पं. स. सदस्य नरेंद्र गेडाम, प्यारेलाल धारगावे तालुका अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, वृषभ मेश्राम ग्रामपंचायत सदस्य चिखला, बिट्टू मेश्राम, गोल्डी घडले उपसरपंच नाकाडोंगरी, शिवम खोब्रागडे, लक्की घडले, महेंद्र लांजेवार, आरती शेंडे पोलीस पाटील सीतासावंगी, शुभम रामटेके, समरीता गोस्वामी, बबीता गुप्ता यांनी दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *