लोक वस्तीत रानडुकरांचा हैदोस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : रानडुकरांनी आता आपला मोर्चा लोक वस्तीकडे वळवला आहे. तुमसर शहरातील गोवर्धन नगर येथील साई कॉलोनीत भर रात्रीच्या दरम्यान रानडुकराचा कळप लोक वस्तीत शिरून एका महिलेवर हल्ला केला, तसेच दुचाकीला धडक देऊन दुचाकीस्वार थोडक्यात बचावले. रविवारी रात्रीच्या नऊ वाजता घडलेल्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानडुकरांचा हल्ल्यात शिला टिळके ह्या थोडक्यात बचावले, तर ईशान शेंद्रे यांनाही चांगलीच दुखापत झाली आहे. शहरात वन्य प्राण्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढतच आहे. आजवर शेतातील पिकात धुमाकूळ घालणाºया वन्यप्राण्यांनी आता लोकवस्तीकडे धाव घेतली आहे. तुमसर शहरातील गोवर्धन नगर येथील साई कॉलोनी परिसरात रानडुकरांचे कळप भर रात्रीला शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटना परिसरामध्ये वाºयासारखी पसरली असल्याने महिला, लहान बालकांसह लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील गोवर्धन नगर येथील एका खाजगी मोकळ्या जागेत झाडी झुडपी मोठ्या प्रमाणात वापल्याने नगरपरिषदेने येथे लक्ष देऊन स्वच्छता करण्याची मागणी आरोग्य अधिकाºयांकडे शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम यांनी सोमवारी केली होती.

या अनुषंगाने नगरपरिषदेने याप्रकरणी दखल घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी मंगळवारी जेसीबी पाठवून स्वच्छता करण्याचे आदेश दिले आणि कामाला सुरुवात झाली. तसेच रानडुकरांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केल्या जात आहे. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, शाखा प्रमुख पुष्पक त्रिभुनकर, ईशान शेंद्रे, राजेश बेदरकर, शैलेश गोमासे, निर्मला शेद्रे, मनीषा ढबाले, नंदा नेवारे, शुभम टिळके, प्रल्हाद नेवारे, गुड्डू ढबाले, ललिता शेंद्रे, जयप्रकाश टिळके, कमलेश गोमासे, विजय शेंद्रे, मंगेश अक्तरी सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.