तुमसर-मोहाडी तालुक्यातील कोतवाल, पोलीस पाटील भरतीत घोळ….

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर: ज्यांना धड लीहता वाचता येत नाही , जे दहावी बारावीत धक्के खाऊंन अगदी किनाºयावर पास होणारे विद्यार्थी पैशांच्या जोरावर कोतवाल आणि पोलीस पाटील भरती परीक्षेत मेरिट मध्ये आलेच कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी भरती प्रकियेत मोठा घोळ झाला असून दोषी अधिकारी वर कारवाही करून नव्याने पारदर्शी भरती प्रक्रिया घेण्याची मागणी आॅल इंडिया स्टूडेंट फेडरेशन ने पत्रकार परिषदेत केली आहे . सदर भरती प्रक्रिया राबविताना तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसिल कार्यालय तुमसर व मोहाडी यांचे कार्यालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरनाम्याच्या अनुषगांने कोतवाल, पोलीस पाटील भरती चा अर्ज अर्जदारांकडून मागविण्यात आले, सदर भरती परिक्षा घेण्यात आली.

परिक्षेत मोठया प्रमाणावर सर्व सामान्य जनतेत व परिक्षार्थी मध्ये घोळ झाल्याची चर्चा आहे. प्रश्न पत्रिकेचे चुकीचे स्वरूप, प्रश्न पत्रिकेतील अनेक चुका, आदर्श उत्तरपत्रिकेतील चुका, प्रश्न पत्रिका ही इव्यता चौथ्या (४) वर्गापर्यंतचा अभ्यासक्रमावर आधारित न काढता, चुकीच्या पद्धतीने काढलेली प्रश्न पत्रिका, पोलीस पाटील-कोतवाल पदाशी संबंधित विषयाला अनुसरून मुलाखत न घेणे, गुणवत्तेनुसार अंतिम यादीउरलेल्या वेळेनुसार प्रकाशित न करणे, ठरलेल्या वेळेनुसार परिक्षा न घेणे, वेळेच्या आधीच आदर्श उत्तर पत्रिका पोर्टलवर न देता परिक्षा केंद्राच्या भिंतीवर लावणे, आपल्या जाहिरनाम्यातील नियमांचे उल्लंघन करणे, याबाबत परिक्षार्थी वारंवार समितीकडे आक्षेप नोदविण्याकरीता गेले असता त्यांचे निवेदन न स्विकारणे, यावरुन कोतवाल – पोलीस पाटील भरती समिती सन २०२३ कडून सदर परिक्षा पारदर्शक रित्या व गांभीर्य पूर्वक घेण्यात आली नसल्याचे दिसून येते असा आरोप पत्रकार परिषदेत परीक्षार्थी सह आॅल इंडिया स्टूडेंट फेडरेशन ने केला असून परिक्षार्थीवर अन्याय होणार नाही व त्यांना न्याय मिळेल, याकरीता फेर परिक्षा घेण्यात यावी व तात्काळ न्याय न मिळाल्यास आॅल इंडिया स्टूडेंट फेडरेशन भंडारा तिव्र आंदोलन करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल. अशा इशाराही पत्रकार परिषदेतून दिला यावेळी पत्रकार परिषदेत वैभव चोपकर, सह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.