तुमसर येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन थाटात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त ‘शिवजन्मोत्सव सोहळा २०२४’ अंतर्गत दिनांक १८ फेब्रुवारी रोज रविवारला भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘क्लिक टू क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड नागपूर’ प्रशांत मिश्रा यांच्या सहयोगातून एकूण ५०० नागरिकांची मोफत नेत्र तपासणी वमोफत चष्म्यांचे वितरण, रक्तदान शिबिराअंतर्गत एकूण ५१ जणांनी रक्तदान केले. तर मोफत बीपी, शुगर, थायरॉईड, दंत तपासणी शिबिरांतर्गत एकूण ३२२ लोकांची तपासणी करण्यात आली.

या निमित्ताने तुमसर-मोहाड़ी विधानसभा प्रमुख इंजी. प्रदीप पडोळे यांनी या महा आरोग्य शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष नितीन धांडे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सचिव प्रा.अमोल उमरकर, उपाध्यक्ष विक्की साठवणे, कोषाध्यक्ष प्रतीक बुद्धे, अंकुश गभने, कोमल वानखेडे, प्रज्वल बुद्धे, नितीन सार्वे, तुषार बागडे, मयूर पुडके, दिपाली बुधे, शर्वरी नखाते व इतर मावळ्यांच्या परिश्रमातून व सर्वांच्या सहकार्याने शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *