आज शिवजन्मोत्सवा निमित्त भंडारा शहरात भव्य बाईक रॅली व शोभायात्रा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : छत्रपती शिवजयंती नागरिक समिती, भंडारा व युवाशक्ती संघटना तसेच भगवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा शहरात शिवजन्मोत्सवा निमित्त विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी स. ७.३० वा. महाराजांच्या मुर्तीस अभिषेक पुजन व आरती करण्यात येईल. त्यानंतर युवाशक्ती संघटना तसेच भगवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅली सकाळी ८.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका जवळून निघेल. सदर रॅली शुक्रवारी वार्डातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळून निघून शास्त्री चौक मार्गे संताजी वार्ड, चांदणी चौक, जिल्हा सामान्य रुग्णालय रोड वरुन बजाज शोरूम पोस्ट आॅफिस चौक ते महात्मा गांधी चौक मार्गे अण्णाभाऊ साठे ते भारत माता चौक, राजीव गांधी चौक ते शितला माता मंदिर खात रोड मार्गे तुळजाभवानी मातेच्या मंदिरा रॅलीचे समापन होणार आहे.

तद्नंतर सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान छत्रपती शिवजयंती नागरिक समिती, भंडाराच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करून या शोभायात्रेत दान पट्टन, भृशुंड ढोल-ताशा पथक, ध्वज पथक, दफली पथक भजन मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज रथाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. सदर शोभायात्रेची सुरुवात मेन रोड येथील राम मंदिरातून होणार असून तुकडोली पुतळा मार्गे गांधी चौक, जलाराम चौक, हेडगेवार चौक, खामतलाव चौक, शिवाजी महाराज बालोद्यान, शुक्रवारी येथे शोभायात्रेचे समारोप होणार आहे. तरी भंडारा शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आयोजि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *