भंडा-यात गाजली अभाविप ची ‘छात्र ललकार’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ‘ललकार छात्रशक्तीचा जागर राष्ट्रीभक्तीचा’ हे भव्य जिल्हा विद्यार्थी संमेलन भंडारा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येत विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवित कार्यक्रमाला भव्य स्वरूप दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक जॅकी रावलानी तर समिती सचिव म्हणून अभाविप पूर्व कार्यकर्ते पुष्पराज कडुकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख प्रा.डॉ.अविनाश नवखरे यांनी केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा उद्योजक जॅकी रावलानी यांनी विद्यार्थ्यांनी नोकरी पुरता शिक्षण न घेता व्यावसाय, उद्योग या विषयात सुद्धा लक्ष्य द्यावे, जेणेकरून इतरांनाही रोजगारांची संधी उपलब्ध होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता विदर्भ प्रांत सहमंत्री पायल किनाके यांनी स्त्रीशक्तीच्या विषयावर उत्साहपूर्ण मार्गदर्शन केलं, त्यानंतर संमेलनाच्या प्रमुख विषयाला सुरुवात करत प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अदीष्ठाता डॉ. संजय कविश्वर यांनी नवीन शैक्षणिक धोरण अर्थातच ‘राष्ट्रीय शिक्षा नीती’ या विषयावर मार्गदर्शन करत नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल सविस्तर माहिती दिली.
त्यानंतरच्या सत्रात जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती सांगत, जिल्ह्यातील छात्र नेत्यांनी विद्यार्थ्यांचा समस्यांवर प्रस्ताव पारित केले व विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्यांवर खुली चर्चा करण्यात आली. यानंतर मंगलमूर्ती सभागृह ते गांधी चौक पर्यंत भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम, ‘छात्रशक्ती… राष्ट्रशक्ती…’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीमय झाले होते. शहरातील मुख्य गांधी चौक येथे महात्मा गांधींजींच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेत अभाविप राष्ट्रीय छात्रशक्ती चे विदर्भ प्रांत संयोजक रुपेश सपाटे यांनी विद्यार्थी परिषदेचे सर्व आयाम व गतीविधी बद्दल माहिती देत परिषदेचाकार्यकर्ता म्हणून अभिमान असल्याचे सांगितले. प्रांत कार्यकारणी सदस्य व मोहाडीचे नगरमंत्री मिलिंद मोटघरे यांनी प्रवेश, परीक्षा आणि परिणाम यांमध्ये विद्यार्थी परिषद कशा प्रकारे काम करते हे सांगितले.
भंडारा जिल्हा संयोजक आदित्य देवगडे यांनी विद्यार्थी परिषद शैक्षणिकच न्हवे तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करणारी संघटना असल्याचे सांगत विद्यार्थी परिषदेच्या गीतांमधून संस्कृतीची जाणीव होते आणि ज्या संघटनेत विद्यार्थी घडविण्याचे, देश घडवण्याचे काम होते अश्या या संघटनेसोबत जुडण्याचे आवाहन त्यांनी जिल्हाभरातील विद्यार्थ्यांना केले. प्रांत कार्यकारणी सदस्य व भंडारा शाखेचे नगरमंत्री नचिकेत बांडेबूचे यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी जर निवेदन देऊन समस्येवर निराकरण होत नसेल तर त्यावेळी आंदोलनाची भूमिका घेत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम अखिल भारतीयविद्यार्थी परिषद करते असे सांगितले. विदर्भ प्रांत सहमंत्री पायल किनाके यांनी सुरुवातीपासूनच स्त्री हि सशक्त आहे असे सांगून आजच्या काळात स्त्रियांची विविध क्षेत्रातील कामगिरी याबद्दल उद्दबोधन करत वातावरण उत्साहपूर्ण केले.
यानंतर नगर संघटनमंत्री आदित्य केंदळे यांनी खठव येथे १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अपमान करणाºया देशद्रोही संघटनांचा निषेध नोंदवत जाहीर सभेचे समारोप केला. या संमेलनाला भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन योगिता राखडे व सुमती ढोमने यांनी केले. या कार्यक्रमावेळी विभाग संघटनमंत्री रोशन ठाकरे, भंडारा कार्यालयमंत्री नकुल निंबेकर, प्रांत कार्यकारणी सदस्य कौस्तुभ लांबकाने व वैष्णवी मंडारे यांच्यासह आदित्य वहिले, अंकित निमकर, सुमती ढोमणे, तमन्ना शेंडे, तनवी नवलकर, प्रणय चिंचेकर, विकास मस्की, प्रलय गहाने यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *