शेतकºयांना प्रति क्विंटल एक हजार रुपये बोनस द्या-मोहन पंचभाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात एकाधिकार धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरु करुन शेतकºयांना प्रति क्विंटल एक हजार रुपए बोनस देण्यात यावा अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. भंडारा जिल्हा भात पिकाचा जिल्हा असून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार एकाधिकार धान खरेदी जिल्हा मार्वेष्ठटींग फेडरेशनच्या माध्यमातून संस्थांमार्फत होत असते. त्यानुसार मागील वर्षात २०० हून अधिक संस्थांना धान खरेदी केंद्र सुरु करण्याची परवानगी शेतकºयांच्या सोयीसाठी देण्यात आली होती. परंतु चालू वर्षात काही संस्थांना नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही.

सध्या शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात धान मळणी सुरु असून तो व्यापाºयांच्या दारात जात आहे. काही प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करणे गरजेचे आहे. परंतु राजकीय हेतूने नवीन लोकांना व पक्ष कार्यकर्त्यांना संधी देवून जुन्यांना डावलण्याच्या राजकारणात शेतकरी भरडला जात आहे. तरी आपल्या स्तरावरुन धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे, अन्यथा भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल व येणाºया दिवसात काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला जाईल व याकरिता सर्वस्वी आपले प्रशासन राहील. असे मोहन पंचभाई यांनी सांगितले निवेदन देतांनी मोहन पंचभाई अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, प्यारेलाल वाघमारे तालुका अध्यक्ष भंडारा, पवन वंजारी युवक जिल्हाध्यक्ष, विनीत कुमार देशपांडे सचिव भंडारा जिल्हा काँग्रेस, गिरीश ठेवकर युवक काँग्रेस महासचिव आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *