विचित्र अपघातात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाºया मालवाहू वाहनावर समोरून येणाºया दोन चारचाकी धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात भंडारा येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस अधिकाºयाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. सदर अपघात देवळी ते वर्धा मार्गावर सकाळी कृषी विज्ञान केंद्रजवळ झाला. सुधाकर चव्हाण (रा. भंडारा) असे मृत सेवानिवृत्त पोलीस अधिकाºयाचे नाव आहे. तर मालवाहू ट्रकचालक अंकुश केने आणि १६ चाकी चालक रामेश्वर (रा. राजनांदगाव, छत्तीसगड) अशी जखमींची नावे आहे. दोन्ही जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली आहे. मालवाहू मिनी ट्रकचा चालक अंकुश केने याने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून विरुद्ध दिशेने देवळीकडे जात होता. दरम्यान, देवळीकडून वर्ध्याकडे येणाºया सोळा चाकी मालवाहू ट्रक व कार या दोन्ही गाड्यांसमोर मिनी मालवाहू ट्रक आल्याने दोन्ही वाहने अनियंत्रित झाली. यात मिनी ट्रकवर जाऊन धडकल्या. या अपघातात १६ चाकी ट्रक आणि कार रस्त्याकडेला खोल खाईत जाऊन आदळल्या. कारचालक सुधाकर चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर १६ चाकी चालक रामेश्वर आणि मिनी मालवाहू ट्रकचालक अंकुश केने हे दोघे गंभीर जखमी झाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.