लोकसभा अपक्ष उमेदवाराने पोते भरून आणली ‘चिल्लर’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : आपल्या विविध आंदोलनांनी नेहमी चर्चेत असणाºया मनोज गेडाम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरताना तब्बल १२ हजार ५०० रुपयांची पोतंभर चिल्लर आणून कर्मचाºयांची चांगलीच दमछाक केली. अनेक हवसे-गवसे निवडणुकीसाठी नामांकन दाखलकरताना आपल्या नावाची चर्चा व्हावी, यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी नामांकन अजार्सोबत अनामत रक्कम म्हणून १२ हजार ५०० रुपयांची नाणी कर्मचाºयांना दिली. गेडाम यांनी ही रक्कमआदिवासी, पारधी व गोरगरीबांनी दिली असल्याचे सांगितले. त्यामुळे अनामत रक्कम म्हणून आणलेली नाणी मोजण्याची वेळ कर्मचाºयांवर आली. अधिकारी, कर्मचाºयांकडून बराच वेळ ही नाणी मोजण्याचे काम सुरू होते. वेळेत चिल्लर मोजल्या जात नसल्यामुळे अधिकाºयांनी मनोज गेडाम यांनाच चिल्लर मोजायला सांगितली. नाणी मोजण्यात वेळ गेल्याने अधिकाºयांनी नामांकन अर्जाची पडताळणी केली व अर्ज ठेवून घेतला. तसेच गेडाम यांना मंगळवारी रक्कम आणायला सांगितली. मनोज गेडाम यांनी मंगळवार, २ एप्रिल रोजी चिल्लर रक्कम जमा करून नामांकन दाखल केल्याची पावती घेतली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.