अट्टल दुचाकी चोरट्यास अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालय वसाहत व अमरावती येथून दुचाकी चोरट्यास शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाने अटक केली आहे. आशिष मेश्राम (२७) रा. पिपरा रोड सोनामाता नगर सिंदी रेल्वे असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्य रुग्णालय वसाहतीतील मनोहर वरघने यांच्या मुलाने एम. एच. ३२ ए. पी. १९९० क्रमांकाची दुचाकी वसाहतीसमोर ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ती पळवून नेली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तपासाअंती पोलिसांनी आशिष मेश्राम याला पुलफैल वर्धा येथून अटक केली. तसेच ७ रोजी अमरावती येथील बडनेरा रोडवरील एका कॉम्प्लेक्स जवळून चोरी गेलेली दुचाकी त्याच्याकडून हस्तगत करून सदर गुन्हा उघडकीस आणला. ही कारवाई पोलिस अमलदार नितीन रायलकर, दिवाकर परिमळ, सुभाष गावड, प्रशांत बावनकर, राधाकीसन घुगे, अनूप राऊत, राजेंद्र ढगे, राहुल भोयर, पवन निलेकर, राजू तांबारे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.