वरठी पोलीसांची जुगार अड्डयावर धाड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वरठी पोलीसांनी ग्राम बिड सितेपार परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकुन तीन आरोपींना अटक करीत १५ हजार ६१० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरठी पोलीस स्टेशनचे पोनि. निशांत मेश्राम यांना मौजा बिड सितेपार, ता. मोहाडी जि. भंडारा येथे नर्सरी, रेल्वे लाईन जवळ एका झाडाखाली काही व्यक्ती तास पत्यावर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे वरठी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मोटार सायकलने सदर ठिकाणी धाड टाकली असता बिड सितेपार परिसरातील बळीराम शहारे यांचे शेताजवळ खुल्या जागेतील नर्सरीमध्ये झाडा खाली चार्जिग लाईटचे प्रखर प्रकाशात तास पत्त्यावर जुगार खेळत असताना मिळुन आले.

पोलीसांनी जुगार खेळणाठया दिपक प्रेमलाल पशिने, वय ५० वर्षे रा. संताजी नगर, भंडारा ,सौरभ कोमल गोंडाणे वय ३० वर्षे, रा. आंबेडकर वार्ड वरठी व बाबूलाल सोंविद मालाधरी वय ४९ वर्षे रा. ग्राम रामपूर (मांडेस्वर ) ता. मोहाडी यांना अटक करून त्यांच्या फळातील ४ हजार रुपए व ५२ तास पत्ते तसेच जुगार खेळणारे दिपक पशिने याचे ताब्यातुन नगदी ४ हजार ३०० रु., सौरभ गोंडाणे यांचे ताब्यातुन नगदी ३हजार ७०० रु. व बाबूलाल मालाधारी याचे ताब्यातुन नगदी ३ हजार ५०० रु. असे एकुण १५ हजार ५०० रुपए नगदी व एक पांढ-या रंगाचे चार्जिग लाईट किंमत १०० रु. असे एकुण मिळुन १५हजार ६१० रूपयांचा मुद्देमाल जपत केला. आरोपींविरोधात पोलीस स्टेषन वरठी येथे अप क्र. १५९/२०२२ कलम १२(अ) मजुका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती,वरठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशांत मेश्राम, सपोनि. सुबोध वंजारी, पोहवा. कुंभरे , पोशि. लांजेवार यांनी केली .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *