फलज्योतिष हे एक थोतांड आहे : शंकर शेलार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ग्रह गोलाच्या स्थितीवरून पृथ्वीवरील व्यक्तीचे भविष्य ठरत नाही तर परिश्रम व योग्य प्रयत्नातूनच व्यक्तीची प्रगती होऊ शकते. ग्रह गोलावरून भविष्य सांगणे ही शुद्ध फसवणूक असून फलज्योतिष्य हे एक थोतांड आहे असे मत खगोल अभ्यासक शंकर शेलार यांनी मांडले ते भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने श्रीमती रेवाबेन पटेल महिला महाविद्यालय भंडारा येथे खगोल विज्ञान व फलज्योतिष्य वास्तव्य व भ्रम याविषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रंजना श्रृंगारपुरे या होत्या.कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रा.डॉ.नितिन शिंदे, राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, ज्येष्ठ खगोल अभ्यास्- ाक शंकर शेलार, म.अनिसचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, प्रा.नरेश आंबिलकर यांनी जादूटोणा विरोधी कायदा वसमाजात असलेली बुवाबाजी यावर मार्गदर्शन केले. यावेळी खगोल विज्ञान व फलजोतिष्य वास्तव्य व भ्रम या विषयावर बोलतांना शेलार यांनी सांगितले की चंद्र व सूर्याला ग्रहण लागले म्हणून त्याचा दुष्परिणाम मनुष्य व गरोदर महिलेवर होतो ही चुकीची व अंधश्रध्दा पसरविणारी संकल्पना आहे. यापासून आपण सावध राहावे असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी चंद्रशेखर भिवगडे, प्रकाश नाकतोडे, प्रा.किशोरदत्त पाखमोडे, डॉ.प्रा.गोवर्धन थोटे, डॉ.राहुल भोरे, प्रा. श्वेता वेगड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.प्रा.शिरीष नखाते यांनी केले आभार प्रा.वर्षा मेश्राम यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *