मणिपुर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा!

भंडारा : मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढून सामूहिक बलात्कार करणाºया आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी भंडारा जिल्हा महिला काँग्रेसतर्पेष्ठ करण्यात आली आहे. त्याबाबत आज दि.२५ जुलै रोजी भंडारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना निवेदन पाठविण्यात आले . मणिपूर येथे ७८ दिवसापासून सुरू असलेल्या हिंसाचारात कुकी आदिवासी महिलांना लग्न करून धिंड काढण्यात आली. महिलांसोबत घडेलेला प्रकार हा अत्यंत लाजिरवाणा , देशाला काळिमा फासणारा व निंदनीय आहे. त्या आदिवासी महिलेचा भाऊ व वडील यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनासुध्दा मारून टाकण्यात आले. त्या महिलांपैकी एका महिलेचा पती भारतीय सेनेत कार्यरत होता तो देशाचा संरक्षण करू शकला पण स्वत:च्या पत्नी चे संरक्षण करू शकला नाही हि खुप मोठी शोकांकीता आहे. तेथील पोलीस प्रशासन स्वस्थ बसलेले होते.हा प्रकार जवळपास अडीच महिने दाबून ठेवण्यात आला . हे कृत्य माणुसकीला हादरवणारे, अंगावर शहारे आणणारे, अमानवीय असून केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. देशाच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मु स्वत: एक महिला असून आदिवासी आहेत. त्यांनी या आदिवासी महिलांवर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडावी . त्यांना न्याय मिळवून देऊन समस्त स्त्री जातीचे संरक्षण करावे .

मणिपूर येथील मुख्यमंत्री विरेन सिंह यांची पदावरून हकलपट्टी करण्यात यावी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिकदृष्ट्या आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,तसेच सदर कृत्य करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी भंडारा जिल्हा महिला अध्यक्ष जयश्री बोरकर, जि. प. सभापती स्वाती वाघाये, जि.प. सदस्या विद्या कुंभारे, अनु जाती जिल्हाध्यक्ष मंजुषा चव्हाण , राजकापूर राऊत , जिल्हा उपाध्यक्ष नवाब पटेल, किशोर राऊत, विनितकुमार देशपांडे, पवन मस्के, पूजा ठवकर, रीना हटवार, कांचन काटेखाये, भारती कांबळे, गुलशन चौव्हाण, पूजा काळे, अनिता काळे, शुभांगी नंदनवार, जयेंद्र , सोनू कोटवानी, नरेंद्र मनापुरे, प्रेमांशू दयाल, दीपक पवार, अरुण गडकरी, उमेश थोमेश, संतोष अवसारे, प्रज्ञ्या नंदेश्वर, नंदा मोगरे, सारिका नागदेवे, कुंदा आगासे, स्नेहा भोवते, यशोदा सार्वे, पुष्पा डुंभारे, कल्याणी भिवगडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *