सोनुली येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील सोनुली येथे आज दि.३० नोव्हें. २०२३ रोजी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन खासदार सुनिल मेंढे, प्रमुख पाहुणे भंडारा पं.स. सभापती रत्नमाला चेटूले, जि.प.सदस्य विनोद बांते, पं.स. सदस्य विलास लिचडे , पं.स.सदस्य किशोर ठवकर, भंडारा गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, भंडारा तहसीलदार विनिता लांजेवार ,भंडारा पं.स. विस्तार अधिकारी प्रमोद तिडके, भंडारा पं.स. विस्तार अधिकारी युवराज कुथे , कृषी सहाय्यक मलेवार, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, त्याच प्रमाणे विविध बँकाचे शाखा अधिकारी, गॅस एजेन्सी प्रतिनिधी, अंगणवाडी पर्यवेक्षिका वर्षा मेंढे , सी. डी. पी. ओ. ढोरे , ग्रा.प. सोनुली सरपंच दिपाली कुरंजेकर तसेच ग्रामपंचायत सदस्यगन व ग्रामसेवक प्रवीण तिडके आदि पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सीधा प्रसारण कार्यक्रमात दाखविण्यात आले तसेच आयुष्मान कार्ड वाटप, उज्वला योजना अंतर्गत गॅस कनेक्शन वाटप, पिक विमा योजनेचे फॉर्म वाटप, आरोग्य शिबीर घेण्यात आले व विविध योजनेची माहिती देण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.