नाल्यात आढळला युवकाचा मृतदेह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर : परिसरातील सालेबर्डी ( खैरी) ते कोरंभी रस्त्यावरील पंडित नाला पुलाखालील पाण्यात युवकाचे प्रेत तरंगताना आढळल्याची घटना आज १२ वाजेच्या दरम्यान उजेडात आली. सालेबर्डी ( खैरी) येथील उप सरपंच जितेंद्र कार्तिक गजभिये आपल्या मोटासायकल ने कामानिमित्त कोरंभी मार्गे भंडारा येथे जात होते दरम्यान लघुशंकेकरिता कोरंभी रस्त्यावरील पंडित नाला येथे थांबले असताना पुलाखालील पाण्यात युवकाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी लगेच घटनेची माहिती सालेबर्डी ( खैरी) येथील पोलिस पाटील हिरालाल पुडके,तमुस अध्यक्ष टोमदेव तितीरमारे यांचेसह जवाहरनगर पो.स्टे.ठाणेदार यांना फोनद्वारे दिली.माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिस पाटील हिरालाल पुडके व तंमुस अध्यक्ष टोमदेव तीतीरमारे, उप सरपंच जितेंद्र गजभिये व नाव्हाडी यांनी डोंग्याचे सहायाने मृतदेह बाहेर काढले. मृतदेहाचे निरीक्षण केले असता मृतक युवकाचे हात पाय दोरीने बांधले होते तर गळ्यात दुप्पटा व मानेवर तसेच पोटावर जखमा आढळून आल्या.

मृतक नयन मुकेश खोडपे वय २३ वर्ष रा. पांढराबोडी अशी मृतकाची ओळख पटली असुन तो २७ नोव्हें.पासून घरून बेपत्ता असल्याची तक्रार वरठी पोलिस ठाण्यात दाखल आहे. मृतक युवकांच्या नातेवाईकांना बोलावून ओळख पटविल्यानंतर उत्तरीय तपासीसाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले. घटना स्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतांनी,अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे , ठाणेदार सुधिर बोरकुटे यांनी भेट दिली.नातेवाईकानी घटना स्थळी दिलेल्या माहिती प्रमाणे नयन यांची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली असल्याचे बोलले गेल्याने,या प्रकरणाचे तपास त्या दिशेने करण्यात येईल असे ठाणेदार सुधिर बोरकुटे यांनी माहिती दिली असली तरी पूढील तपास पो. हे.मंगल कुथे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *