भाऊबीज सानुग्रह अनुदानासाठी आशांची खासदारांना ओवाळणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आशा वर्कर्सनी कोविड महामारीच्या संकटकाळी आपल्या जिवावर उदार होऊन सेवा दिली, त्यामुळे राज्यात अनेक आशांना संसर्ग होऊन आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या या बलिदानामुळेच कोविड महामारीचा मुकाबला करता आला व केंद्र व राज्य सरकारांची मान उंचावली. या आशा वर्कर्सच्या या कामाचे दस्तुरखुद जागतिक आरोग्य संघटनेने भरभरुन कौतुक केले. त्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक कर्मचाºयांनी गुरुवार दि.२७ आक्टोंबरला किमान एक महिण्याचा मानधन भाऊबीज भेट म्हणुन देण्यात यावे यासाठी आयटक संघटनेच्या आवाहनावर भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेकडो आशा व गटप्रवर्तकांनी खासदार सुनिल मेंढे यांच्या भंडारा कार्यालयावर जाऊन भाऊबीज निमित्त खासदारांना चक्क ओवाळणी आंदोलन केला. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणविर, कार्याध्यक्ष आशिशा मेश्राम, सचिव सुनंदा दहिवले, उपाध्यक्ष भुमिका वंजारी, जिल्हा संघटक राजु बडोले, गोंदिया जिल्हाध्यक्ष वर्षा पंचभाई, सचिव शालु कुथे, उपाध्यक्ष माया कोरे यांनी केले. खासदारांच्या कार्यालयात सजवलेल्या आरतीच्या थाळी द्वारे खासदारांना टिका लावुन व पेढा भरवुन ओवाळण्यात आल्यानंतर खासदार महोदयांनी बाहेर असलेल्या शेकडो आशा व गटप्रवर्तकांना संबोधित करतांना आशा वर्कर्सचे कार्य कोविड काळात अत्यंत मोलाचे होते. तेव्हा आपली मागणी योग्य आहे. त्यामुळे मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस यांच्याशी बोलणी करेन. एवढेच नाहीतर केन्द्र सरकारनी तुमच्या मानधनात वाढ करावी यासाठी केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचेशी बोलेन असे जाहीरपणे आश्वासन दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.