व्हॉट्सगृप माहितीच्या आधारे रेती तस्करांवर कारवाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना तुमसर येथे रेतीची तस्करी होत आहे, अशी माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीकारी तुमसर श्रीमती निती पुडी रस्मीताराव यांचेशी बोलणी करुन त्यांनी ठाणेदार पोलीस स्टेशन तुमसर सहायक पोलीस निरीक्षक नितीन अशोकराव मदनकर यांना आदेश देवुन पोलीस विभाग व महसुल विभाग यांनी संयुक्त कार्यवाही करुन रेती व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती देणारे २२ रेती तस्कर आरोपींवर व एक टॅक्टर ट्रॉलीसह व इतर मुद्देमाल असा एकुण ४,०५,५०० रुपये रक्कमेचा माल ताब्यात घेवुन कार्यवाही केली. गुरुवार दि. २७ आक्टोबर रोजी पोलीस ठाणे तुमसर येथील मौजा डोंगरला शिवार, तामसवाडी ते डोंगरला रोड ५ कि. मी. पुर्व येथे फिर्यादी ओमप्रकाश धोंडुजी भुरे (३७) रा. डोंगरगाव, ता. मोहाडी, व्यवसाय तलाठी व उपविभागीय अधिकारी, तुमसर हे त्यांचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचेसह पेट्रोलींग करीत असतांना यातील टॅक्टर चालक आरोपीने त्याच्या ताब्यातील टॅक्टर व ट्रॉलीमध्ये आरटीओ नोंदणी क्रमांक न टाकता सदर टॅक्टरमध्ये अवैध १ ब्रास रेती अंदाजे किंमती ३ हजार रू. ची वाहतुक करीत असतांना फिर्यादी यांचे वाहन पाहुन त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये असलेली रेती खाली केली.

यातील ट्रॅक्टर चालक आरोपीचे मोबाईलमधील व्हॉट्सएॅपचे र्रल्लॅँें टंेिं ड१ ढअफ ङअट २५ या नावाचे असलेल्या ग्रुपमध्ये २१ मोबाईल धारक आरोपी १) ट्रॅक्टर चेसीस क्र. २४४१८१३९१०७ व ट्रॉली चा चालक /मालक श्याम रतनलाल पटले रा. डोंगरला, व हश्ळऋ २) ९१४५२४०५३४, ३) ८४५९५७०४०३, ४) ९०२२८३६४८७, ५) ९३५६५२४१७२, ६) ९९७५२३५०१९, ७) ७५०७९९६४७५, ८) ७४९८६०५५९५, ९) ९५२७७९३६८०, १०) ७८८७३००३६७, ११) ९१४५४३३२५६, १२) ९०४९८२९९७०, १३) ८६५७६३२२८९, १४) ८८०६८९६०४५, १५) ९४०३८५७८३१, १६) ९७६३६९५११२, १७) ८३९०२०२४६८, १८) ९७६४५०९६१६ १९) ८२६१८२५३४१, २०) ७७६९८७९३१२, २१) ९०२२८३६४८७ २२) ९६०७३४९६२९ मोबाईल क्रमांकाचे धारक यांना उपविभागीय अधिकारी, तुमसर यांचे खाजगी टवेरा वाहनाचे तसेच त्या नियमित वापरीत असलेल्या स्कॉर्पीओ वाहन क्र. ९४८० चे लोकेशन वरुन कट रचून आॅडीओ मॅसेजद्वारे व्हॉट्सएॅप वर प्रसारीत करून अवैध रेती उत्खनन व वाहतुक करणाºयांना तसेच ट्रॅक्टर चालक आरोपीस सहाय्य केले.

नमुद ट्रॅक्टर चालक आरोपीने त्याच्या ट्रॅक्टर मधील रेती खाली करून पुरावा नष्ट केल्याची तसेच मोबाईल धारकांनी व्हॉट्सएॅपद्वारे लोकेशन प्रसारीत करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्यादीने लेखी तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन तुमसर येथे अप. क्र. अप.क्र. ४३९/२०२२ कलम ३७९, १०९, १२० (ब), २०१, १८६ भादंवि सहकलम ४८(७), ४८(८) जमिन महसुल अधिनिम १९६६, सहकलम ५०/१७७ मोवाक गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मदनकर हे करीत आहेत. सदर कार्यवाहीत आरोपींकडून ट्रॅक्टर चेसीस क्र. व ट्रॉली अंदाजे किंमती ४ लाख रु., एक ५ हजार रु. किमतीचा मोबाईल, एक साधा मोबाईल किंमत ५०० रु. असा एकुण ४,०५, ५०० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील इतरही तालुक्यात ज्या ठिकाणी नद्या वाहतात त्याठिकाणी अशाच प्रकारचा अवैध रेतीचा गोरखधंदा केल्या जाते. मात्र चिरीमिरीच्या नादात याकडे दुर्लक्ष केले जाते. सदर प्रकार सर्रास सुरु असूनही महसूल व पोलिस प्रशासन काहीच कारवाई करीत नाही. परंतु एखाद्या वेळेस कारवाई केलीच तर त्याचा गाजावाजा मात्र केला जातो.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *