तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयालाच डॉक्टरांची गरज

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयालाच डॉक्टरांची नितांत गरज असल्याची बाब समोर आली आहे. तर सोयीसुविधांची याठिकाणी वानवा होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी तात्काळ रुग्णालयात बालरोग तज्ञ, सिझेरीयन करीता २४ तास डॉक्टर, सिटीस्कॅन मशीन आॅपरेटर व लहान मुलांकरीता आयसीयू रुमची व्यवस्था करावी, अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमसर तर्फे वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आले . तुमसर तालुक्यात एकमेव सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे १०० खाटाचे रुग्णालय तालुक्याच्या ठिकाणी असुन या रुग्णालयात तुमसर शहरातील तसेच तुमसर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामधुन गरजु रुग्ण या रुग्णालयामध्ये औषधोपचाराकरिता येतात. तसेच त्यामधे बालरुग्णाची दिवसाला ओपीडी सरासरी ७० ते ८० च्या घरात असते. हि १५०० ते २००० व आंतररुग्ण ३०० ते ४०० असतात. तसेच तुमसर तालुक्याला लागुन मध्यप्रदेशामधुन सुध्दा बरेच रुग्ण या रुग्णालयामध्ये येतात. तेव्हा या रुग्णालयाचा रुग्णाचा व्याप लक्षात घेता तज्ञ डॉक्टराची रुग्णालयाला नितांत गरज आहे. त्याचबरोबर रुग्णालयात औषधीचा पुरवठा बरोबर होत नाही. सिटी स्कॅन मशीन असुन अनेकदा निवेदन दिल्यानंतरही अद्यापही आॅपरेटर मिळाला नाही, तुमसर येथे लहान मुलांकरीता आयसीयु रूम ची व्यवस्था नाही. प्रसूती आणि सिजर करीता २४ तासाकरीता डॉक्टरची उपलब्धता करण्यात यावी आदी मागण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वैद्यकीय अधीक्षक डॉ. धीरज लांबट यांना दिले. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव तथा माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, रा.यु.का. शहर अध्यक्ष सुनिल थोटे, माजी नगर सेवाक सलाम तुरक, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.