बचतगट महिलांच्या हातातून कचरा व्यवस्थापन व्हावे : कुर्तकोटी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : प्रत्येक गावात, प्रत्येक कुटूंबात ओला आणि सुका कचरा निर्माण होतो. गावाच्या हिताचे आणि मौलाचे कचरा व्यवस्थापनाचे कार्य बचतगट महिलांच्या हातातून व्हावे असे आवाहन केले. तब्ब्ल तिन गावस्तरावर निर्माण होणाºया कचºयाचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. व्यवस्थापनामुळे गावातील उकीरड्यावरील कचरा दिसणार नाही. परिणामी गाव स्वच्छ व सुंदर करण्यास सहज सोपे जाते. हिच कचरा व्यवस्थापनाची संकल्पना गावात पोहचविण्याकरीता भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर एम. कुर्तकोटी यांनी साकोली पंचायत समिती अंतर्गत लवारी गावाला भेट दिली. सरपंच, ग्रा. पं. व विविध समित्यांचे पदाधिका- तास गावात उपस्थित राहून बचतगटाच्या महिलांशी संवाद साधला आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांची पहाणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) एम. एस. चव्हाण, गट विकास अधिकारी श्री जाधव, विस्तार अधिकारी श्री टेंभरे, श्री मेंढे, तर गावस्तरावर सरपंच नरेश नगरीकर, उपसपंच हरिश नगरीकर, सचिव झोडे, जितेंद्र गेडाम, री आणि बचतगटातील महिलांशी संवाद साधीत अश्विन बनसोड, कमलेश फरकुंडे, विनोदशेंडे, सोनम पाझारे, गट समन्वयक निरंजण गणवीर, समुह समन्वयक जनार्धन, ग्राम पंचायत व विविध समित्यांच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम सरपंच नगरीकर व सचिव झोडे यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी, सरपंच सचिव, ग्राम पंचायत पदाधिका-याशी संवाद साधला. ओडिएफ प्लसच्या दृष्टीने माध्यम निवडले पाहिजे. नव्वद टक्के ओला कचºयाची विल्हेवाट घरगुती स्तरावर विल्हेवाट लावल्यानंतर दहा टक्के कच-याची विल्हेवाट बचतगट महिलांच्या माध्यमातून कशी लावली जावू शकते या बाबतची संकल्पना बचतगट महिलांच्या पुढे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुर्तकोटी यांनी मांडली. कचरा व्यवस्थापनातील तीन आर रिजेक्ट, रियूज व रिसायकलचे महत्व सांगितले. ह्या गावस्तरावर सुरू असलेल्या कामांबाबत माहिती घेतली. तर गावातील बचतगट महिलांच्या हातातून कचरा व्यवस्थापन कसे करता येईल, या बाबत महिलांना कचरा व्यवस्थापनाचे धडे दिले. ग्रामीण भागातील प्रत्येक गाव व प्रत्येक कुटूंबात ओला व सुका कचरा निर्माण होतो. त्यातही नव्वद टक्के पेक्षा कचरा गृहिणीच्या हातातून निर्माण होतो. जो कचरा निर्माण होतो, त्यामध्ये अनेक गावात ओल्या कचºयाचे व्यवस्थापन घरगुती स्तरावर होते. परंतु सुका व घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होतो. या तिन्ही आरचे महत्व पटवून देण्याकरीता बचतगट महिलांना समुदायाने शिकविणे आवश्यक असल्याचे सांगितले. याकरीता त्यांनी एका खेळाचे आयोजन केले. पाच महिलांचा एक, असे पाच गट बनविले. प्रत्येक गटावर एक महिला निरिक्षक नेमली. या गटांना अवघ्या पाच मिनिटांत कागदाच्या जास्तीत जास्त होड्या तयार करण्याचे काम दिले. प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी पाच मिनिटे तयारी, नियोजन याकरीता दिली. निरीक्षक महिलांना नियोजनापासून तर पुढचे निरिक्षण करण्यास कचºयाचे व्यवस्थापनाकरीता बचतगट हे सांगितले. प्रत्यक्ष होड्या बनविण्याची वेळसंपल्यावर प्रत्येक निरिक्षक महिलेने तिची निरिक्षणे सादर केली. यासाठी त्यांना नियोजन सुरू होण्यापूर्वी बाजूला घेऊन माहिती दिली होती. तसेच त्यांना निरीक्षणाचे मुद्दे छापलेले फॉर्म दिले होते.

या खेळाच्या माध्यमातून “टीम वर्क” कसे करायचे? याबाबत अनेक गोष्टी समजल्या. तद्नंतर घरातील कचरा पेटीत कोणत्या वस्तू टाकल्या जातात याची नावे उपस्थित महिलांकडून घेतली. त्यांचे तीन आर पुढाकारातून पुढे आली. यासाठी बचतगटात संकलन, देखरेख, विक्री, जागृती, कलाकुसर बाबतच्या समित्या स्थापन करायच्या व सर्वांनी त्या टीममध्ये काम करून गावात निर्माण होणाºया सुका कोरडा घनकचºयाचे व्यवस्थापन करता येईल, अशी संकल्पना लवारी गावात तीन तासात मांडून महिलांच्या हातातूनच कचरा व्यवस्थापन व्हावे असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर एम. मध्ये महिलांकडूनच वर्गीकरण करण्यात आले. आणि त्याच ठिकाणी गावातील स्वच्छतेबाबतचा आराखडा तयार करण्यात आला. ज्या वस्तुंची घरगुतीस्तरावर विल्हेवाट लावता येणार नाही अशा वस्तू बचतगटात जमा करायच्या आणि त्यातून काही कलेच्या किंवा उपयोगी अशा वस्तू तयार करता येतील का? किंवा त्या भंगारात विकून त्याचे पैसे बचतगटात जमा करता येईल, यावर महिलांना महत्व पटवून देण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत गावाच्या कचरा डेपोत कचरा जाणार नाही ही कुर्तकोटी यांनी केले. यावेळी गावात व आजूबाजूच्या गावातील बचतगटाच्या महिलांची उपस्थिती होती. त्यानंतर त्यांनी गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकरीता निर्माण होत असलेले वैयक्तिक व सार्वजनिक शोषखड्डे, नाडेप, प्लॉस्टीक साठवण शेडची पहाणी केली. सेंदूरवाफा येथील उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील पिण्याचे पाणी,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनची पहाणी करून चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना विविध प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना महत्वाची बाब या खेळातून बचतगट महिलांच्या बिनधास्तपणे चिमुकल्यांनी उत्तरे दिलीत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *