पूर्वी मतपेटीतून सरकार यायचे, आता खोक्यातून येत आहे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिग्रस/यवतमाळ : आज कार्यकर्त्यांशी संवाद साधायला आलो. जाहीर सभेला पाऊस झाल्यावर येईन. देशात आणि राज्यात जे गद्दार आणि लाचारांचे सरकार आहे त्याचा नायनाट करून पुन्हा सरकार येऊ दे, अशी प्रार्थना पोहरादेवी येथे दर्शनाच्या वेळी आई जगदंबेला केली. भाजप हप्ता घेणाºया बाजारबुणग्यांचा पक्ष झाला आहे. पक्ष फोडीसोबत तुम्ही पक्षाचे नाव व चिन्ह हिरावून घेतले. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी जनतेच्या मनातून आम्हाला काढू शकत नाही. आमदार खासदार गेले तरी दमदार शिसैनिक माझ्यासोबत आहेत. त्यामुळे हे निष्ठावान गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते स्थानिक प्रकाश कृषी उत्पन्न बाजार समिती येथे यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातील आपल्या गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्याला संबोधित करीत होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, पूर्वी मतपेटीतून सरकार यायचे. आता तर खोक्यातून सरकार जन्माला येत आहे.

सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणाºयांचे फोटो आता मोदींसोबत येणार. आता भह्यष्टाचाराचा आरोप करणारे गप्प का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कलम ३७० हटवताना आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला.आता समान नागरी कायदा आणतात म्हणे. पहिले जनतेला सांगा समान नागरी कायदा म्हणजे काय. एक देश एक कायदा ठीक आहे. पण एक देश एक पक्ष आम्हाला कदापी मान्य नाही, अशी टीका त्यांनी करत पालकमंत्री संजय राठोड व खासदार भावना गवळी यांना धडा शिकविल्या-ि शवाय स्वस्थ बसणार नाही अशी गर्जना करून भाजपा व शिंदे गटावर तोफ डागली. या प्रसंगी खासदार अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व संजय देशमुख यांची भाषणे झाली. जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, संतोष ढवळे, राजेंद्र गायकवाड, माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार यांच्यासह यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो समर्थक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *