गोठ्यात शिरून बिबट्याने केली शेळीची शिकार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : जंगलातून भटकून गावात शिरलेल्या बिबट्याने गोठ्यात शिरून बांधलेल्या शेळीवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून एक गर्भवती शेळी (३ वर्ष) फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना तालुक्यातील पुयार येथे ९ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून मंगेश गोपीनाथ लांडगे (४०) असे पीडित पशुपालकाचे नाव आहे. पीडित पशुपालक शेतकरी असून शेतीला जोड व्यवसाय म्हणून गत काही वर्षापासून पशुपालनाचा व्यवसाय करीत आहेत. पशुपालन अंतर्गत गाई, म्हशी, वासरु, मेंढ्यांचे व शेळ्यांचे पालन केले जाते. वन्य प्राणी भक्ष्याच्या शोधात गावात प्रवेश करतात. गत काही वर्षांपासून या परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. आत्तापर्यंत अनेक प्राणी आणि मानवांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान, ९ जुलै रोजी जंगलातून भटकून पुयार गावात आलेल्या बिबट्याने गावातील रहिवासी मंगेश लांडगे यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला केला.        यामध्ये शेळीचा मृत्यू झाला.

हल्ला केल्यानंतर बिबट्याने शेळीला ३०० मिटर ओढत जवळच्या शेतापर्यंत नेल्याचे सांगितले. ही घटना रविवारी उघडकिस आली. घटनेच्या आदल्या दिवशी पशुपालकाने गाई, म्हशी व शेळ्या चारुन आणुन राञीच्या सुमारास घरालगत असलेल्या गोठ्यात बांधुन ठेवल्या. माञ, राञीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक शेळी फस्त केली. ह्या दुर्घटनेत पिडीत पशुमालकाचे जवळपास १२ हजार रुपयाचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई मिळण्याची मागणी गावकºयांत केली जात आहे. सदर घटनेची माहिती वनविभागाला होताच येथील वनपरीक्षेञाधिकारी रुपेश गावीत यांच्या मार्गदर्शनात येथील वनरक्षक डी. एस. कडव घटनास्थळी पोहचुन घटनेचा पंचनामा केला. पंचनामा करतेवेळी पुयारचे सरपंच शैलेश रामटेके, पो. पा. शुश्वगंधा बोरकर, वनमजुर अविनाश पंधरे, मंगेश लांडगे यासह अन्य नागरिक व गावकरी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *