श्रद्धा ची अत्याचार करून हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील पापडा येथील ०८ वर्षीय श्रद्धा किशोर सिडाम हि २८ नोव्हें. ला बेपत्ता झाल्याचा बनाव करण्यात आला होता व ३० नोव्हें.ला तिचा मृतदेह पापडा येथेच तणसींच्याढिगाºयात जळालेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आज ( ता. ०७.) ला पोलीसांच्या प्रयत्नाला यश येऊन श्रद्धाचा मारेकरी पोलीसांच्या जाळ्यात अडकला. सदर आरोपी घराशेजारील अल्पवयीन असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे संपूर्ण विदर्भात खळबळ उडवून देणाºया श्रद्धा सिडाम हत्याप्रकरणी १७ वर्षीय आरोपी हा पापडा येथील श्रद्धाच्या घरापासून सुमारे १० ते १५ मीटर अंतरावर रहाणारा आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २८ नोव्हेंबरला शिक्ष कांची निवडणूक सभा असल्याने शाळेची सुट्टी दू. १:३० वा. झाली त्यामुळे श्रद्धा लवकर घरी आली. परंतु आई घरी नसल्याने आईच्या शोधात शेजारी रहात असलेल्या आरोपीच्या घरी आईला शोधायला गेली गेली. आरोपीच्या घरी कुणीच नव्हते त्याने मुलीला घरात नेलेव डाव साधून तिच्यावर अतिप्रसंग केला. हि घटना मुलीने घरी सांगेन म्हणाल्याने आरोपीने श्रद्धाचे तोंड दाबल्याने श्वास गुदमरून त्यातच श्रद्धाचा मृत्यू झाला.

आरोपीने मृत श्रद्धाला पोत्यात भरून घरामागील खड्ड्यात बूजविले. सदर प्रकाराचा थांगपत्ता लागू नये यासाठी आरोपीने श्रद्धाचा मृतदेह खड्ड्यात गाडुन त्यावर तणसीचा काडी कचरा टाकून थिमेट टाकल२८ नोव्हेंबर च्या संध्याकाळी पोलिसांना माहिती मिळताच संपूर्ण पोलीस प्रशासनाने श्रद्धा ची शोध मोहीम सुरू केली होती. याकरिता श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते शोध मोहीमेत श्वान पथक हे अल्पवयीन आरोपीच्या घरासमोर जाऊन थांबत होते मात्र तपासा दरम्यान गावात कोणत्याही प्रकारची माहिती पोलिसांना मिळत नव्हती हे सगळं सुरू असताना३० नोव्हेंबरच्या रात्री आरोपीने संधी साधून श्रद्धाचे प्रेत पोत्यासह खड्ड्यातून काढून हे घरामागील शेत शिवारात असलेल्या तणसीच्या ढिगारात नेऊन जाळले. या घटनेने पोलीस प्रशासन आरोपीच्या शोधात होते संशयीतांना ताब्यात घेऊन विचारणा केली जात होती. पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे जयवंत चव्हाण व त्यांची चमू तसेच साकोलीचे ठाणेदार जितेंद्र बोरकर व त्यांची चमू पापडा गावात ठाण मांडून होती. अखेर पोलिसांना तपासा दरम्यान मुख्य आरोपी गवसला व श्रद्धाच्या खून प्रकरणी अल्पवयीन मुख्य आरोपीला पकडण्यात यश आले. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विरोधात कलम ३७६,३०२, २०१ भांदवि तसेच पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *