नियोजन विभागातील मुजोर कर्मचाºयावर आळा कोण घालणार ?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास ासाठी जिल्हा नियोजन विभाग हा महत्त्वाच्या कणा असून जिल्ह्यातील विकास कामांचा प्रारूप तयार करून कार्यान्वित करण्याची जबाबदारी नियोजन विभागावर असते विभागातीलच कर्मचाºयांच्या बेजबाबदार व दुर्लक्षित धोरणामुळे कोट्यावधीची विकास कामे कागदोपत्री बंदिस्त झाल्याची माहिती उघडकीस येत आहे. नियोजन विभागातील एका मुजोर महिला कर्मचाºयांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे झालेल्या अनेक विकास कामांची देयके रखडली असून ऐन दिवाळीच्या तोंडावर कंत्राटदार, मजूर वर्ग व साहित्य पुरवठाधारकांची देयके न मिळाल्याने दिवाळी अंधारात जाण्याचे चित्र निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास निधी खर्च न झाल्यामुळे अधिकाºयांना कानमंत्र दिला होता व सूचना केली होती की जिल्ह्याच्या विकासासंबंधी दुर्लक्षित कार्यप्रणाली अवलंबिल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल. नियोजन विभागात कार्यरत एका मुजोर महिला कर्मचाºयाच्या बेजबाबदार व वेळ काढू धोरणामुळे खासदार निधी व आमदार निधी तील अनेक विकास कामे रखडली असल्याची माहिती राजकीय वतुर्ळात व्याप्त आहे. लोकप्रतिनिधींचीच कामे होत नसतील तर सर्वसामान्यांच्या कामांचे काय असा प्रश्न उभा ठाकला आहे.

खासदार , आमदारांचे स्वीय सहाय्यक, सरपंच, जि प सदस्य , सभापती, व पंचायत समिती सदस्य अशालोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांना अनेक विकास कामांचे प्रस्ताव नियोजन विभागात सादर करून विकास कामांकरिता मंजुरी घ्यावी लागते. अनेक प्रस्तावांमध्ये त्रुट्या असतात त्या त्रुट्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो मात्र त्रुटी सदृश अनेक प्रस्ताव हे नियोजन विभागात या महिला कर्मचाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे प्रलंबित असल्याची बोंबाबोंब लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यक व पदाधिकाºयांमध्ये व्याप्त आहे. खासदार, आमदार व विधान परिषद सदस्य यांच्या स्थानिक विकास निधी ची कामे रखडली असल्याने लोकप्रतिनिधींची प्रतिमा सार्वजनिक रित्या मलीन करण्याचा सतत प्रयत्न या दुर्लक्षित धोरणामुळे होत असल्याची चर्चा आहे. विकास कामात त्रुटी सदृश प्रस्ताव, झालेल्या विकास कामांची देयके, प्रस्तावित विकास कामांना मंजुरी, अशी अनेक कामे दुर्लक्षित कार्यप्रणालीमुळे प्रलंबित असल्याने स्वीय सहाय्यक व पदाधिकारी त्रस्त झाले आहेत. सदर मुजोर महिला कर्मचाºयांच्या वर्तणुकीबद्दल वरिष्ठांना अनेकदा तक्रारी केली असता वरीष्ठांनी दखल न घेतल्याने स्वीय सहाय्यक व पदाधिकारयांमध्ये असंतोष व्याप्त आहे.

‘नियोजन विभाग कार्यालयात आलेल्यांनी कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाºयाच्यां विरोधात तक्रार असल्यास माज्याशी संपर्क साधावा. मी स्वत: प्रामाणिक रित्या सर्व सामान्य नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.’

-श.क.बोरकर जिल्हा नियोजन अधिकारी भंडारा

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *