हागणदारी प्लस वलमाझरी व लवारी गावात शाश्वत स्वच्छेतेचा संकल्प

प्रतिनिधी साकोली : हागणदारीमुक्त गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापणाच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता सुविधा निर्माण करून गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करण्यात आल्याने साकोली तालुक्यातील वलमाझरी आणि लवारी ही दोन्ही गावे हागणदारीमुक्त प्लस म्हणून जागतिक जलदिनाचे औचित्य साधून ग्रामसभेमध्ये घोषीत करण्यात आले. दोन्ही गावातील ग्राम पंचायत पदाधिकारी व नागरिकांनी गावात शाश्वत स्वच्छता टिकविण्याचा संकल्प केला आहे. ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता टिकविण्याकरीता स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा २ अंर्तगत नागरिकांचा सहभाग व व्यापक जनजागृतीद्वारे वैयक्तिक कुटूंबियांना शौचालयासोबतच वैयक्तिक व सार्वजनिकस्तरावरील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या स्वच्छता सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.

साकोली तालुक्यातील खैरीवलमाझरी व लवारी ही दोन्ही गावे जागतिक जलदिनाचे औचित्य साधून ग्रामसभेत हागणदारीमुक्त प्लस घोषीत करण्यात आली. या प्रकल्पाची अंमलबजावणी गटविकास अधिकारी खिलेंद्र टेंभरे यांचे नेतृत्वात होत आहे. वलमाझरी येथे सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे, ग्रामसेवक नरेश शिवणकर, तालुका कक्षाचे (पाणी व स्वच्छता) जनार्धन डोरले, उपसरपंच सत्यपाल मरस्कोल्हे, तं.मु.अ. श्रीराम रूखमोडे, पो.पा. शंकर कापगते, प्रबुध्द नागदेवे, हेमराज मडावी, घनश्याम हातझाडे, सुनिल मरस्कोल्हे यांची उपस्थिती होती. तर लवारी येथे सरपंच नरेश नगरीकर, ग्राम विकास अधिकारी आर. एम. झोडे, उपसरपंच हरेश नगरीकर, तालुका कक्षाचे (पा. व स्व.) समुह समन्वयक निरंजन गणवीर, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रशेखर कापगते, ग्राम पंचायत सदस्य, अंगणवाडीसेविका, आशा सेविका, बचतगटाच्या महिला व नागरिकांची उपस्थिती होती. गावात निर्माण होणाºया वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छता सुविधांच्या माध्यमातून गावात शाश्वत स्वच्छता टिकविण्याचा संकल्प ग्रामसभेत नागरिकांनी केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *