कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे आरोग्यसेवा रखडली

भंडारा पत्रिका/प्रतिनिध सिहोरा : सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, आरोग्यवर्धिनी केंद्र, आंग्ल दवाखाना मंजूर करण्यात आला आहे. रिक्त पदे असल्याने ही आरोग्यसेवा आजारी झाली आहे. उपकेंद्रातील समस्या मोठी असली, तरी आरोग्यसेवकांची आठ पदे असताना फक्त एक कार्यरत आहे. आरोग्यसेवेवरून शासन किती गंभीर आहे, त्याचे बोलके चित्र परिसरात अनुभवायला मिळत आहे. सिहोरा परिसरातील ४७ गावांतील नागरिकांना आरोग्य सेवा सुलभ करण्यासाठी तीन तीन कि.मी. अंतरावर दवाखाने मंजूर करण्यात आले आहेत. सिहोºयात ग्रामीण रुग्णालय, चुल्हाडात आरोग्यवर्धिनी केंद्र आणि बपेºयात आंग्ल दवाखाना मंजूर करण्यात आला आहे. लोकसंख्या वाढत आहे. रुग्णालयात ओपीडी वाढत आहे. कर्मचाºयांची संख्या वाढविण्याऐवजी त्यात कपात केली जात आहे. यावरून आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्याच्या अपेक्षा मावळल्या आहेत. सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात औषध निर्माण अधिकारीचे पद रिक्त आहे.

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हे पदही रिक्त झाले आहेत. याशिवाय कक्ष सेवकांची दोन पदे रिक्त आहेत. शिपाई, क्षेत्र साहाय्यक, कनिष्ठ लिपिकाचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. ग्रामीण रुग्णालयात अशी एकूण आठ पदे रिक्त आहेत. कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीही बिकट स्थितीत आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. चुल्हाडच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात व्यवस्था नाही. बपेरा, चुल्हाड, मोहाडी खापा, सिहोरा, हरदोली, टेमनी, वाहनी अशी आठ उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांतील आरोग्यसेविकेची चार पदे रिक्त आहेत. बपेरा, हरदोली, सिहोरा, वाहनी आरोग्य उपकेंद्रांना आरोग्यसेविकाच नाहीत. आरोग्यसेवकांची आठ पदे आहेत. फक्त एक कार्यरत आहे व सात पदे रिक्त आहेत. एकाच्या खांद्यावर सर्व गाव लादण्यात आली आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्रात प्रयोगशाळा तज्ज्ञाचे एक पद आहे. परंतु, हे पद भरण्यात आले नाहीत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *