गाव विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निर्वाचित झालेल्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा लाखनी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांना काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत कमिटीने गाव विकास आराखडा तयार करून निधीची मागणी करावी. जिल्हा परिषद व पंचायत समिती काँग्रेस च्या ताब्यात असल्याने निधीची कमतरता भासणार नाही. असे सांगितले. तसेच भाजपा चे कार्यकर्ते अंकुश कनतोडे व अशोक बडवाईक यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. तालुका व शहर काँग्रेस कमिटी द्वारा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी ५:०० वाजता कच्छी मेमन हॉल येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा साकोली विधान सभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले प्रमुख अतिथीपदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी, काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी महासचिव राजा तिडके, प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य आकाश कोरे, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी प्रभारी अ‍ॅड. नंदा पराते, जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, युवक जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत, इंटक चे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष भरत खंडाईत, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, समाजकल्याण सभापती मदन रामटेके, आरोग्य व शिक्षण सभापतीरमेश पारधी, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीषा निंबार्ते, सरिता कापसे, विद्या कुंभरे, पंचायत समिती सभापती प्रणाली विजय सार्वे, पंचायत समिती सदस्य सुनील बांते, विकास वासनिक, योगिता झलके, मनीषा हलमारे, अश्विनी कांन्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आमदार नाना पटोले यांनी उपस्थितांना निधीची कमतरता जाणवणार नाही. असे आश्वासन दिले आणि उपस्थित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच लाखोरी येथील भाजपा चे कार्यकर्ते अंकुश कानतोडे, अशोक बडवाईक यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने त्यांचा आमदार नाना पटोले यांचेहस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याचे संचालन धनंजय तिरपुडे तर आभार पप्पू गिरेपुंजे यांनी मानले. सत्कार सोहळ्याचे यशस्वितेसाठी जिल्हा उपाध्यक्ष ?ड. शफी लद्धानी, माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू निर्वाण, युवक आघाडी अध्यक्ष यशवंत खेडीकर, विजय सार्वे, धम्मा रामटेके यांचेसह काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *