साकोलीत सडक सुरक्षा सप्ताहाचे विद्यार्थ्यांच्या रॅलीने समापन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह ११ ते १७ जानेवारी २०२३ च्या समापन प्रसंगी साकोली शहरातील मुख्य मार्गावरून अग्रवाल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर प्राय.लिमी, एसएमएसएल, जेंट व्हेचर कंपनी, वाहतूक पोलीस विभाग गडेगाव व साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने नंदलाल पाटील कापगते महाविद्यालय येथून रोड सुरक्षा जनजागृती रॅली ( ता. १७ जाने.) ला काढण्यात आली, या रैलीत ५०० च्या वर विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या रैलीला प्राचार्य किशोर डोये यांनी हिरवी झेंडी दाखवित सुरूवात केली.

सदर रैलीत हेल्मेट सक्ती, सिट बेल्ट, व सर्व वाहतुकीचे नियम पाळा, वाहनांच्या गतिवर नियंत्रण, वाहन अपघात विमा, अपघात टोल फ्री विविध क्रमांक, वाहन चालवताना मोबाईल निषिद्ध, रात्री वाहतुकीचे नियमांत लाईट व सिग्नल यंत्रणा समजावी असे फलकांतून जनतेला संदेश दिला. रैलीत सुरक्षा प्रबंधक श्रीनिवास दंडू, वाहतूक पोलीस अधिकारी डि.वाय. सावरकर, प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पांडे, एस एस राजपूत, राजेंद्र सिंग, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, मनोज शर्मा, वरूण सिंग, वाहतूक पोलीस अश्र्विन भोयर, दिनेश तिजारे, अनिल तवाडे, आय ई सुब्बरायडू, शिक्षक धनंजय तुमसरे, गणेश बोरकर, शरद देशमुख, आर व्ही दिघोरे, राजेश खोटेले, मुकेश हटवार आणि सर्व शिक्षकवृंद व नागरीक रैलीत हजर होते. या आयोजनात अग्रवाल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर प्राय. लिमी, एसएमएसएल, जेंट व्हेचर कंपनीतील सुरक्षा कर्मचारी, पेट्रोलिंग कर्मचारी, वाहतूक पोलीस विभाग गडेगाव व साकोली येथील पोलीस कर्मचारी यांची महामार्गावर रैली करीता वाहतूक नियमाने व्यवस्था सांभाळली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *