बिबट्याच्या कातडीसह ११ नखे जप्त, तीन आरोपींना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपृूर : बिबट्याची शिकार करून त्याचे चामडे आणि अवयवांची तस्करी करणाºया तीन आरोपींना नागपूर आणि वडसा देसाईगंज वनविभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चामडे, नखे आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. विनायक मनिरम टेकाम, मोरेश्वर वासुदेव बोरकर आणि मंगलसिंग शेरकु मडावी (सर्व रामगड, ता. कुरखेडा जि. गडचिरोली), अशी आरोपींची नावे आहेत. बिबट्याची शिकार करून त्याचे अवयव वेगवेगळे करून तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावरून नागपूर वनविभाग आणि वडसा वनविभागाचे संयुक्त पथक तयार करून सापळा रचण्यात आला होता. यासाठी एक बनावट ग्राहक तयार करून मागील तीन दिवसांपासून त्याला तस्करांच्या संपर्कात ठेवण्यात आले होते. तस्करांची अधिक माहिती व आरोपीचे मोबाइलचे लोकेशन वडसा वनविभागाच्या पथकाला पाठविण्यात आले. त्यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून १६ जानेवारीच्या सायंकाळी सौदा ठरविण्यात आला.

सापळा रचून तीन आरोपींना बिबट्याचे चामडे आणि ११ नखांसह ताब्यात घेण्यात आले. या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२च्या विविध कलमांद्वारे वनगुन्हे नोदविण्यात आले. बुधवारी दुपारी कुरखेडा येथील प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर आरोपींना उपस्थित करण्यात आले. गडचिरोलीचे वनसंरक्षकडॉ. किशोर मानकर, नागपूरचे उपवसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, वडसाचे उपवसंरक्षक धर्मवार सालविठ्ठल, यांच्या मार्गदर्शनासाखली विभागीय वनअधिकारी (दक्षता), नागपूर वनवृत्तचे पी. जी. कोडापे, सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. वाडे, बि. एच. दिघोळे, क्षेत्र सहायक काकलवार, वनरक्षक तवले, पडवळ, जाधव, शेंडे यांनी ही कारवाई केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *