नागपूरमध्ये मास्क बंधनकारक, शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाºयांचे पत्र

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नागपूरमध्ये करोना तीन लाटा संपल्यानंतर दोन वर्षांनी हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशन काळातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मास्क लावणं आता बंधनकारक असणार आहे. जिल्हाधिकाºयांनी तसं पत्रक काढलं आहे. शासकीय आणि निमश- ासकीय कार्यालयातले सगळे अधिका- री आणि कर्मचारी यांना आणि येणाºया सगळ्या नागरिकांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. नागपूरमधल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. तसंच या कार्यालयांमध्ये येणाºया नागरिकांनीही मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. लवकरच सर्व नागरिकांसाठीही आम्ही असे आदेश काढणार आहोत अशीही माहिती जिल्ह्याधिकाºयाांनी एका वाहिनीशी बोलताना दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसºया लाटेत नागपूरमध्येकरोनाचे रूग्ण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

सद्य स्थितीत करोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे जगातल्या अनेक देशांमध्ये कोव्हिड १९ ची लाट पसरली आहे. या विषाणूचा शिरकाव भारतात होऊन पुन्हा एकदा करोनाच्या चौथ्या लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी मास्कचा उपयोग हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यलाय, अस्थापन येथील अधिकारी आणि कर्मचारी तसंच भेट देणारे नागरिक यांनी मास्कचा वापर करावा. नागपूरमध्ये करोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. हे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनी नागपूरमध्ये भरलं आहे. या ठिकाणीही मास्क सक्ती होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासंदर्भातला निर्णय हा नागपूर महापालिकेचे आयुक्त घेऊ शकणार आहेत. त्यामुळे तसं घडलं तर अधिवेशनातही मास्क लावणं सक्तीचं होईल अशीही शक्यता आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *