अधिवेशनापूर्वीच आमदार निवासांतील वीज पुरवठा खंडित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच आमदाराच्या थांबण्याची सोय असलेल्या आमदार निवासात दुपारी १० ते १५ मिनिटे वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे येथे उपस्थितांकडून आश्चर्य व्यक्त केले गेले. नागपुरातील आमदार निवासाच्या द्वारापर्यंत महावितरण वीज पुरवठा करते. अंतर्गत वीज पुरवठ्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) विद्युत विभागाची असते. मंगळवारी दुपारी ३.३५ ते ३.५० दरम्यान येथे पंधरा मिनिट वीज पुरवठा खंडित झाला. यावेळी येथे खोलीचा ताबा घेण्यासाठी काही आमदारांचे स्वीय सहाय्यकांसह काही अधिकारीही उपस्थित होते. अधिवेशनाच्या तोंडावर आमदार निवासाचीच वीज खंडित झाल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याबाबत महावितरणच्या एका अधिकाºयाला विचारना केली असता त्यांनी आमचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला. तर पीडब्लूडीच्या विद्युत विभागाच्या अधिकाºयाशी संपर्क साधला असता त्यांनी इतर भागातून वीज पुरवठा वळवण्यासाठी काही मिनटे वीज पुरवठा खंडित केला, असे सांगितले परंतु अधिवेशनापूर्वी तब्बल १५ मिनीट वीज पुरवठा खंडित झाल्याने येथील देखभाल व दुरूस्तीच्या कामावर प्रश्न उपस्थित झाले आहे. दरम्यान पीडब्लूडीच्या अधिकाºयाने येथे जनरेटरची सोय केली असल्याचा दावा करत येथे सहसा वीज पुरवठा खंडित होत नसल्याचेही सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *