कृषी फिडरचे काम शेतकºयांनी पाडले बंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : एकोडी पॉवर हाऊस अंतर्गत येणाºया किन्ही, चांदोरी, पिटेझरी व बोद्रा या गावामधील कृषी फिडरचे काम एकोडी येतील तिडके पेट्रोल पंप जवळ नियमबाह्य रित्या चालू होते. ते काम एकोडी येथील सरपंच संजु खोब्रागडे, पिंडकेपार येथील सरपंच नंदू समरीत साकोली पंचायत समिती सभापती गणेश आदे, डॉ. ललित हेमने पं.स. सदस्य, डॉ.वसंता बाळबुद्धे, मनोज कोंटागले एकोडी, डॉ. नेपाल रंगारी व उपस्थित असंख्य शेतकºयांनी विद्युत विभागाच्या अभियंता व ठेकेदाराचा घेराव करून सदर काम बंद पाडले.

एकोडी व पींडकेपार क्षेत्रात कोणत्याच प्रकारचे नदी, नाले किंवा धरण नसल्या कारणाने येथील शेतकरी हा विहीर व बोअरवेल च्या माध्यमातून सिंचन करुन शेती करत आहे, परंतु ८ तास कृषी वीज वितरणासाठी वेगळे फि- डर करण्यासाठी लाईन पोलचे काम चालू होते यांची माहिती होताच परिसरातील शेतकºयांनी एकोडी येथील सरपंच संजु खोब्रागडे, पिंडकेपार येथील सरपंच नंदू समरीत साकोली पंचायत समिती सभापती गणेश आदे यांनी ज्युनिअर इंजिनिअर यांना घटनास्थळी बोलवून खड्डे बुजवायला लावले. यावेळी प्रामुख्याने हरीश दोनोडे सरपंच परसटोला संदीप मेश्राम पळसपाणी, दिलीप कापगते जितू रहाटे उपसरपंच चांदोरी, रिगण राऊत उपसरपंच एकोडी, मधोराव येळे ऊसगाव, तसेच घानोड, आमगाव, परसटोला, चांदोरी, सोनेगाव, ऊसगाव, आतेगाव बांपेवाडा येथील शेतकरी उपस्थित होते. सदर काम पुन्हा चालू केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी आंदोलन कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *