रूग्णवाहिकेची बाईकला धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील गडेगाव परिसरात एका रूग्णवाहिकेने दुचाकीला आमोरासमोर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात २ जण गंभीर तर ४ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दि.६ जून रोजी सायं.६ वाजेच्या सुमारास घडली. रायपूर कडून नागपूर कडे जाणारी ओमानी रूग्णवाहिका क्र.एमपी-५०, डीए ०१२८ हि चुकीच्या दिशेने जात असता नागपूर कडून रायपूर कडे विरुद्ध दिशेने येणाºया पल्सर क्रं एमएच. ३५ ऐक्यु. १९४८ हिला आमरोसमोर धडक दिली.त्यात मोटारसायकलवरील दोन इसम गंभीर जखमी झाले असुन रूग्णवाहिकेमधील ४ इसम किरकोळ जखमी झाले.

जखमींना लगेच तिथे उपस्थित असलेली अशोका टोल प्लाझा च्या रूग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचाराकरीता पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच गडेगाव वाहतुक पोलीस मदत केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत अपघातग्रस्त रूग्णवाहिका व मोटारसायकलला क्रेन च्य्या सहायाने रस्त्याच्या बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. अपघातातील गंभिर जखमींमध्ये राहुल परमानद नागपुरे वय २६ वर्षे रा माहेगाव जि. बालाघाट (मध्य प्रदेश) व सुरज उके वय २८ वर्षे रा. पाजरा जि.गोदीया यांचा समावेश असुन किरकोळ जखमींमध्ये मधुकर बागडे वय २६ वर्ष , राजकुमार मंडलवार वय ३८ वर्षे, सुरवन मंडलवार वय ३८ वर्षे व प्रदिप गौतम वय २६ वर्षे सर्व रा. गोवारा जि. बालाघाट (मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *