जय संघर्ष चालक मालक सामाजिक संघटननचा बुधवारला नागपुर विधान भवनावर मोर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची त्वरित अंमलबजावणी करणे या प्रमुख मागणीसह विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यासाठी जय संघर्ष चालक मालक सामाजिक संघटना तर्फे बुधवार दि. १३ डिसेंबरला नागपुर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर साहेब यांचे नेतृत्वाखाली होणाºया आंदोलनात वाहन चालक मालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती शोभनाताई गौरशेट्टीवार पवनी यांनी केले आहे. वाहन चालकांसाठी स्व.बाळ- ासाहेब ठाकरे रस्ता अपघात योजनेची घोषणा करण्यात आली. अध्यादेश काढण्यात आला, मात्र शासनाचे दिशानिर्देश प्राप्त झाले नसल्याचे कारणावरून अपघातातील जखमींना खासगी रुग्णालयात उपचार नाकारण्यात येत आहे.

वाहन चालकांसाठी आर्थिक महामंडळाचे राज्य सरकारने वारंवार घोषणा केली, प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र केलेली नाही. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात संघटनेचे हिवाळी अधिवेशनावर धडक देऊन निवेदन दिले. मात्र एक वर्ष पूर्ण झाले तरी कोणतीच कारवाई झालेली नाही. वाहन चालकांसाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात यावे, ई- चालन च्या नावाने परिवहन अधिकारी यांचे कडून होणारी लूट थांबवावी येणाºया सर्व प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांच्या प्रवासी क्षमतेत वाढ करावी, वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करावेत, वाहन चालकांच्या पाल्यांना विभाग स्तरावर वस्तीगृह, मोफत शिक्षणाची सोय, बांधकाम मजूरांस दिल्या जाणाºया सुविधा, अपघाती मृत्यू झाल्यास २५ लाख रुपए, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, शहरात मोफत घरे या सह अन्य मागण्यांबाबत नागपुर विधान भवनावर धडक मोर्चा निघणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *