शाळेने पालकांकडुन घेतलेले अतिरिक्त शुल परत करण्याचे आदेश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या पुढाकाराने तुमसर येथील यु. एस. ए. विद्यानिकेत शाळा व्यवस्थापना कडुन होणाºया आर्थिक लुटमारीला चाप बसला असुन पालकांनी माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांचे आभार मानले आहेत. तुमसर येथील यु.एस.ए.विद्यानिकेत शाळा व्यवस्थापनाकडुन ठराविक वेळेत शालेय फिस न भरल्याने त्यावर व्याजासह पालकांकडुन अतिरिक्त फिस वसुलण्यात येत होती.तसेच विद्यार्थ्यांना शालेय परिक्षेला बसु न देण्याची धमकी सुध्दा शाळेकडुन पालकांना देण्यात येत होती. त्याची तक्रार पालकांनी माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्याकडे केली. चरणभाऊ वाघमारे यांनी लगेच तुमसर पंचायत समिती शिक्षण विभागाशी संपर्क साधुन यु.एस.ए. विद्यानिकेत शाळा व्यवस्थापनाकडुन पालकांची होणारी आर्थिक लुटमार लक्षात आणुन देत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रकारामुळे पंचायत समिती शिक्षण विभाग खळबळुन जागे झाले व त्यांनी लगेच शाळा व्यवस्थापनाच्या नावे एक लेखी आदेश काढत ‘आरटीई अ‍ॅक्ट २००९’ नुसार शिक्षक पालक संघाने ठरविलेल्या फिस व्यक्तीरिक्त कोणत्याही प्रकारची फिस/पेनाल्टी शुल्क शासन मान्यतेशिवाय आकारली जावु शकत नाही असे असतांनाही शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी पालकांकडुन बळजबरीने अधिकची पेनाल्टी शुल्क आकारून अधिकचे पैसे वसुल करण्यात आले आहे.करीता पालकांकडुन वसुल करण्यात आलेले अतिरिक्त शुल्क पालकांना परत करण्यात यावे तसेच कुठल्याही विद्याथ्यार्ला परिक्षेपासुन वंचित ठेवु नये असे आदेश देण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *